उद्या डॉ. आंबेडकर चौकात महत्त्वाची बैठक
बुद्ध जयंती महोत्सवाचे बिगुल वाजले

विविध उत्सवांच्या नियोजनासाठी समित्यांची होणार निवड
अमरावती /27 मार्च : मानवतेचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध यांची 2570 वी जयंती यंदा 1 मे रोजी जगभरात मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. अमरावती शहरात धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्याच्या उद्देशाने गेल्या 21 वर्षांपासून बुद्ध जयंती, बुद्ध महोत्सव आणि विश्वशांती रॅलीचे आयोजन करण्यात येते. या परंपरेचे हे 22 वे वर्ष असून, या सोहळ्याच्या पूर्वतयारीसाठी ’बुद्ध जयंती उत्सव समिती’ची विशेष बैठक रविवार, 29 मार्च 2026 रोजी सायंकाळी 7 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील त्यांच्या पुतळ्यापाशी आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत जयंती उत्सवाच्या यशस्वीतेसाठी विविध समित्यांची घोषणा केली जाणार आहे. यंदा 11 एप्रिल रोजी क्रांतीज्योती जोतिबा फुले जयंती आणि 14 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती असा दुग्धशर्करा योग असल्याने, संपूर्ण शहर भीममय आणि बुद्धमय करण्यासाठी समिती सज्ज झाली आहे. या बैठकीला अखिल भारतीय भिक्खू संघ, भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल, त्रैलोक्य बौद्ध महासंघ यांसह विविध आंबेडकरी पक्ष, संघटना, महिला बचत गट आणि सामाजिक-राजकीय क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. या नियोजन प्रक्रियेत मुख्य संयोजक सुनील रामटेके, धनंजय गुळदेकर, प्रा. डॉ. रवींद्र मुंडरे, रणजित चव्हाण, मनीष साठे, मनोहर घोडेस्वार, प्रा. डॉ. संजय खडसे, प्रा. गोपीचंद मेश्राम, किशोर बोरकर, ड. पी. एस. खडसे, रविकांत गवई, हिवराळे गुरुजी, सिद्धार्थ देवरे, सुनील मेश्राम, जगदीश गोवर्धन, प्रा. अनिल गोटे, भाऊराव वावरे, सेवानंद वाकोडे, प्रा. उईके, वासुदेव उईके, सुभाष महाजन, मनोज शेगोकार, सुनंदा नागदिवे, आशा बडगे, आशा मेश्राम, आशा नागदिवे, रजनीताई गुळदेकर, रजनी चव्हाण, प्रियांका रंगारी, कविता रामटेके, राष्ट्रपाल घरडे, विजू गणवीर, सुमेध नागदिवे, रवी जुमळे, उत्तमराव बोरकर, मदन गायकवाड, प्रवीण वासनिक, समिद खान, चंद्रकांत मेश्राम, रूपराव बनसोडे, दिनेश पाटील, वामन रंगारी, करण यादव, शोएब खान जे.के., श्रीकांत शेगोकार, अशोकराव मेश्राम, ड. बबलू रंगारी, माणिक लोखंडे आणि नाना रंगारी हे सक्रिय सहभाग नोंदवत आहेत.
नियोजनाचा हुंकार, एकजूट व्हा!-बुद्ध जयंती आणि विश्वशांती रॅली ही आपल्या अस्मितेचा सोहळा आहे. या भव्य महोत्सवात तरुणांनी आणि माता-भगिनींनी हिरीरीने सहभागी व्हावे, जेणेकरून अमरावतीचा हा 22 वर्षांचा वारसा अधिक दिमाखात जगासमोर येईल.




