नराधम खरातला तात्काळ फासावर लटकवा

अमरावतीत युवक काँग्रेसचा कडाडून हल्ला

अमरावती /23 मार्च : नाशिक येथील नराधम भोंदू बाबा अशोक खरात याने महिलांच्या असहायतेचा फायदा घेत केलेल्या पाशवी अत्याचाराचे पडसाद आता संपूर्ण राज्यात उमटू लागले आहेत. या संतापजनक घटनेच्या निषेधार्थ अमरावती विधानसभा युवक काँग्रेसच्या वतीने स्थानिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे रान पेटवण्यात आले. राज्याची संस्कृती काळवंडणार्‍या अशा भोंदूगिरीचा आणि अत्याचाराचा नायनाट करण्यासाठी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले होते. यावेळी कार्यकर्त्यांनी भोंदू बाबाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. राज्यात माता-भगिनी सुरक्षित नसतील, तर कायदा आणि सुव्यवस्थेचा उपयोग काय, असा संतप्त सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला. पीडित महिलांना तातडीने न्याय मिळवून देण्यासाठी आणि अशा नराधमांना कठोर शासन होईपर्यंत हा लढा थांबणार नाही, असा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला. या आंदोलनात भैय्याजी पवार, अनिकेत डेंगळे, वैभव देशमुख, आशिष यादव, प्रियाल मोहोड, कौस्तुभ देशमुख, श्रेयस धर्माळे, वेदांत केने, मोहित भेंडे, धनंजय बोबडे, चैतन्य गायकवाड, आकाश दुराटकर, आकाश गेडाम, शुभम बांबल, मनन अत्री, शंतनु हिवसे, शंतनु देशमुख, कृणाल गावंडे यांच्यासह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहभागी होऊन आपला रोष व्यक्त केला. सरकारने या प्रकरणाची सखोल नराधम खरातला तात्काळ फासावर लटकवा चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
नराधमांना आता धडा शिकवणारच!- धर्माच्या नावाखाली महिलांचे शोषण करणार्‍या नराधम खरातचा गुन्हा माफीच्या पलीकडे आहे. अशा भोंदू बाबांमुळे समाजातील विश्वासार्हता धोक्यात आली असून, त्याला कठोर शिक्षा व्हावी यासाठी युवक काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेत अमरावतीच्या चौकात न्यायाची मागणी लावून धरली आहे.

संबंधित बातम्या

Back to top button