दर्यापुरात संघाच्या संचलनावर मुस्लिम बांधवाची पुष्पवृष्टी

सलीम घाणीवाले यांच्याकडून सामाजिक सलोख्याचे दर्शन

संघाचे राष्ट्रकार्य प्रेरणादायी असल्याची दिली ग्वाही

दर्यापूर /1 नोव्हेंबर  – शहरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने शिस्तबद्ध पथसंचलन काढण्यात आले. शेकडो स्वयंसेवक यामध्ये शिस्तीत सहभागी झाले असताना एका मुस्लिम बांधवाने केलेल्या स्वागताने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. सलीम घाणीवाले यांनी संचलन मार्गावर उभे राहून स्वयंसेवकांवर मनमोकळेपणाने फुलांची उधळण केली. संघ देशाच्या सर्वच क्षेत्रात चांगले काम करत असल्याचे सांगून आपण या विचारांनी प्रेरित असल्याचे त्यांनी आवर्जून स्पष्ट केले. या घटनेने गावात सामाजिक एकोप्याचा नवा संदेश गेला.
दर्यापूरच्या मुख्य मार्गावरून संघाचे पथसंचलन अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने निघालेहोते. वादनाचे ताल आणि स्वयंसेवकांची पावले यामुळे परिसर दुमदुमून गेला होता. रस्त्याच्या दोन्ही बाजूला नागरिक शिस्त पाहण्यासाठी उभे होते.संचलन सलीम घाणीवाले यांच्या घरासमोरून जात असताना त्यांनी फुलांचे ताट हातात घेऊन स्वयंसेवकांवर फुलांचा वर्षाव केला. एका मुस्लिम बांधवाने अशा प्रकारे पुढे येऊन केलेले स्वागत पाहून उपस्थित नागरिकांनी कौतुक केले. या कृतीने गावातील माणसांची मने जिंकून घेतली.आपली भावना व्यक्त करताना घाणीवाले म्हणाले की संघ कुठल्या एका पुरता मर्यादित नाही. देशातील प्रत्येक कामात संघाचे लोक पुढे असतात. त्यांचे हे समाजकार्य पाहून मला आनंद वाटतो आणि त्यांच्या विचारांनी मी खूप प्रेरित झालो आहे. या कृतीमुळे गावात परस्पर प्रेमाचे उत्तम उदाहरण पाहायला मिळाले.

Back to top button