बच्चू कडूंच्या नावाला शिवसेनेतूनच विरोध

सर्वसामान्य शिवसैनिकांच्या तोंडचा घास देऊ नये

अकोला/24 एप्रिल: विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेना शिंदे गटाच्या कोट्यातून बच्चू कडू यांचे नाव चर्चेत येताच शिवसेनेंतर्गत तीव्र नाराजी पसरली असून पश्चिम विदर्भातूनच त्यांना विरोध केला जात आहे.
पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे सर्वसामान्य शिवसैनिकांच्या तोंडचा घास बाहेरच्यांना देणार नाहीत, याचा विश्वास आहे. बच्चू कडूंचा पक्ष स्वतंत्र असल्याने त्यांना आमदारकी दिल्याने विदर्भात शिवसेना वाढणार नाही, अशा शब्दात शिवसेनेचे राज्य समन्वयक रामेश्वर पवळ यांनी नाराजी व्यक्त केली. विधानसभा निवडणुकीतील बळीराम सिरस्कार यांचा दाखला देत पक्षासोबतच विश्वासघात झाल्याचेही त्यांनी म्हटले.विधान परिषद निवडणुकीच्या मोर्चेबांधणीला वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या कोट्यातून आमदारकीसाठी बच्चू कडूंना विचारणा झाल्याची चर्चा आहे. याच मुद्द्यावरून शिवसेनेचे राज्य समन्वयक रामेश्वर पवळ यांनी समाज माध्यमांवर एक चित्रफित प्रसारित करून नाराजी व्यक्त केली. सर्वसामान्य शिवसैनिकाला संधी देण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
बच्चू कडू यांचा पक्ष आणि विचार स्वतंत्र “सर्वसामान्य शिवसैनिक हा पक्षासाठी झटत असतो. त्यामुळे त्यांचा अधिकार हा पहिला असतो. त्यांच्या तोंडचा घास बाहेरच्या व्यक्तीला एकनाथ शिंदे देणार नाहीत, असा ठास विश्वास आहेच. बच्चू कडू यांचा पक्ष आणि विचार स्वतंत्र आहेत. बाहेरच्या व्यक्तीला एवढी मोठी जबाबदारी दिल्याने शिवसेना वाढणार नाही. या आमदारकीवर शिवसैनिकांचा हक्क असून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांनाच संधी देतील. शिवसैनिक कुठला असो किंवा कुठल्याही जाती-धर्माचा असो त्यांना या पदावर काम करण्याची संधी दिल्या गेली पाहिजे,” अशी अपेक्षा रामेश्वर पवळ यांनी व्यक्त केली.

संबंधित बातम्या

Back to top button