बच्चू कडूंच्या मागणीवर बावनकुळेंची तिखट टीका

अशी भूमिका मांडणे शिस्तीत बसत नाही

शहरात महायुती नेत्यांच्या वक्तव्यांवरून राजकीय खळबळ

युतीचा समन्वय राखण्याचे नेत्यांना कडक निर्देश

अमरावती /8 जून– महायुतीमधील काही नेत्यांची मुख्यमंत्री पदाबाबतची विधाने आणि शेतकरी कर्जमाफीवर केलेली टीका यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आ. बच्चू कडू यांना सूचक शब्दांत कानपिचक्या दिल्या आहेत. मुख्यमंत्री पदासारख्या संवेदनशील विषयावर सार्वजनिक व्यासपीठावरून विधाने करण्यापेक्षा पक्ष नेतृत्वाशी चर्चा करणे जास्त योग्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. गावागावात जाऊन मुख्यमंत्री पदाच्या दावेदारीबाबत भूमिका मांडणे महायुतीच्या शिस्तीत बसत नाही, असेही त्यांनी सुनावले आहे.
आ. बच्चू कडू यांनी नुकतेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची इच्छा व्यक्त केली होती, तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे केंद्रात प्रमोशन झाले पाहिजे, असे विधान केले होते. यावर बावनकुळे यांनी अमरावती दौर्‍यावर असताना आपली भूमिका मांडली. फडणवीस यांना दिल्लीला पाठवण्याचा किंवा राजकारणातून बाहेर करण्याचा अधिकार कोणालाही नाही. देवेंद्र फडणवीस यांनी विकसित महाराष्ट्राचा संकल्प केला असून ते राज्याला पुढे नेण्यासाठी दिवसरात्र काम करत आहेत. महायुती सरकारला राज्यातील जनतेने पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त पाठिंबा दिला असून, हे सरकार पूर्ण ताकदीने काम करत आहे. महायुतीमध्ये भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस असे सर्व घटक पक्ष एकजुटीने काम करत आहेत.
कोणत्याही महत्त्वाच्या विषयावर जाहीर भाष्य करण्यापूर्वी समन्वय समितीच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. महायुतीच्या समन्वय समितीत महत्त्वाच्या मुद्द्यांवर थेट सार्वजनिक विधाने न करता, नेत्यांशी चर्चा करण्याचा निर्णय झाला आहे. नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर युतीच्या पातळीवर चर्चा

महायुतीचा विजय आणि एकजूट महत्त्वाचे

राज्यात महायुती सरकार भक्कम असून कोणत्याही नेत्याने सार्वजनिक व्यासपीठावर वादग्रस्त विधाने करणे टाळावे. समन्वय समितीच्या ध्येयधोरणांचे पालन करूनच प्रत्येक पाऊल उचलणे गरजेचे आहे. मुख्यमंत्री पदाबाबतची अधिकृत भूमिका केवळ पक्ष नेतृत्वच घेऊ शकते, हे सर्वांनी लक्षात घ्यावे. जनतेने दिलेल्या कौलानुसार राज्यात विकासाचे काम वेगाने सुरू असून महायुती आगामी काळातही एकजुटीने महाराष्ट्राला प्रगतीपथावर नेण्यासाठी कटिबद्ध आह

संबंधित बातम्या

Back to top button