भ्रष्टाचाराचे पुरावे द्या, कारवाई करतो

बावनकुळे यांचे वडेट्टीवारांना आव्हान

नागपूर/30 मार्च : केवळ माध्यमांसमोर वक्तव्य करून काही होणार नाही. जर खरोखर चौकशी हवी असेल, तर मुख्यमंत्र्यांकडे किंवा संबंधित यंत्रणेकडे पुरावे द्यावेत, कारवाई होईल या शब्दांत महसूल विभागातील कथित भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांना खुले आव्हान दिले.
महसूल मंत्री बावनकुळे म्हणाले की, विजय वडेट्टीवार यांच्यासह विरोधी पक्षातील नेत्यांनी प्रसार माध्यमांसमोर वक्तव्य करून काही होणार नाही. जर खरोखर चौकशी हवी असेल, तर मुख्यमंत्र्यांकडे किंवा संबंधित यंत्रणेकडे भ्रष्टाचाराचे पुरावे द्यावेत. कोणताही अधिकारी दोषी आढळल्यास त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. बावनकुळे म्हणाले की, केवळ प्रसिद्धीसाठी संवेदन शील प्रकरणांवर वक्तव्य करणे योग्य नाही. अशा बोलण्यामुळे चौकशी यंत्रणांवर दबाव येऊ शकतो, याचीही काळजी घ्यावी. कोणत्याही अधि कार्‍याच्या कुटुंबाबद्दल बोलणे चुकीचे आहे. गोपनीय माहिती असल्यास ती सरकारकडे द्यावी, असे त्यांनी सांगितले.अतिसंवेदनशील खरात प्रकरणाबाबत अधिक बोलण्यास त्यांनी नकार देत, हे अतिसंवेदनशील प्रकरण आहे. चौकशी यंत्रणा आपले काम करत आहे. तपासात अडथळा येऊ शकतो, असे म्हटले.

संबंधित बातम्या

Back to top button