शेतकर्‍यांना कर्जमाफी देणारच-मुख्यमंत्र्याचा शब्द

टिपूची शिवरायांशी तुलना खपवून घेणार नाही

मुंबई/26 फेब्रुवारी – शेतकर्‍यांसाठी पीक विमा पद्धतीत बदल करण्यात आला असून अवकाळी पावसामुळे बाधित शेतकर्‍यांना 15 हजार 472 कोटी रुपये थेट खात्यात जमा करण्यात आले. कर्जमाफीसंदर्भात समिती स्थापन केली असून अ‍ॅग्रीस्टॅकद्वारे डिजिटल नोंदींच्या आधारे निर्णय घेतला जाईल. कर्जमाफी आम्ही करणारच आहोत, त्याबाबतचा निर्णय योग्यवेळी जाहीर करून, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मागेल त्याला कृषीपंप योजनेत 85 टक्के मागण्या पूर्ण केल्या असून 2022 ते 2025 दरम्यान 10 लाख 63 हजार पंप बसवल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था 2012-13 साली 13 लाख कोटी होती. गेल्या 11 वर्षांत ती 51 लाख कोटींपर्यंत आली. आम्ही राज्याची अर्थव्यवस्था तिपटीने वाढवली. आता 90 लाख कोटींचा टप्पा गाठायचा आहे. महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे, ज्याने 660 बिलियनचा टप्पा पार केला आहेत. इतर कुठलेही राज्य अर्थव्यवस्थेच्या बाबतीत आपल्याइतके पुढे नाही. त्यामुळे राज्य दिवाळखोरीत निघाल्याचे सांगून विरोधक जनतेची दिशाभूल करीत आहेत, असा हल्लाबोल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी विधानसभेत केला. राज्यपालांच्या अभिभाषणा वरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, देशाच्या जीडीपीमधील महाराष्ट्राचा वाटा सातत्याने वाढत आहे. 2021-22 मध्ये हा वाटा 13.1 टक्के होता, 2023-24 मध्ये 13.5 टक्के, 2024-25 मध्ये 13.8 टक्के झाला असून आता तो 14 टक्क्यांच्या जवळपास जाईल, असा प्राथमिक अंदाज आहे. राज्याचे जीएसटी संकलन जवळपास 3 लाख 60 हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचले असून कृषी निर्यातीत 12 टक्के आणि सेवा क्षेत्रात 24 टक्के वाटा आहे. जीडीपीच्या तुलनेत कर्जाचे प्रमाणही नियंत्रित ठेवण्यात महाराष्ट्र यशस्वी ठरल्याचा दावा त्यांनी केला. 2029-30 पर्यंत 1 ट्रिलियन डॉलर आणि 2047 पर्यंत 5 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था उभारण्याचा रोडमॅप तयार करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या

Back to top button