दोन दिवसांनी शरद पवारांना मिळाला ब्रीच कँडीतून डिस्चार्ज

मुंबई/7 नोव्हेंबर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना छातीत दुखणे आणि कफाचा त्रास जाणवल्यामुळे 2 नोव्हेंबर 2026 रोजी पुण्यातील रुबी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यानंतर दोन दिवस उपचार घेतल्यानंतर त्यांना 4 नोव्हेंबर 2026 रोजी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आणि पुढील तपासण्यांसाठी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. ज्यानंतर त्यांच्या प्रकृतीविषयी सर्वांनीच चिंता व्यक्त केली. परंतु आता दोन दिवसांनंतर शरद पवारांना ब्रीच कँडी रुग्णालयातूनही डिस्चार्ज देण्यात आला आहे. या रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारांना त्यांनी चांगला प्रतिसाद दिल्यानंतर आणि प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्यांना रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले आहे.मागील दोन दिवसांपासून शरद पवारांवर ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू होते.





