सतीश चव्हाण यांना पुन्हा राष्ट्रवादीची उमेदवारी

सुनेत्रा पवार यांची अधिकृत घोषणा

मुंबई/4 ऑक्टोबर : सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विधान परिषदेच्या मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून सतीश चव्हाण यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. सतीश चव्हाण उद्याच उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी 23 ऑक्टोबरला मतदान होणार असून 27 ऑक्टोबरला मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे. महायुतीकडून मराठवाडा पदवीधर मतदारसंघाची जागा राष्ट्रवादीला देण्यात आली आहे. याच जागेवर पक्षाकडून सतीश चव्हाण यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे.
मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून तीनवेळा मी निवडून आलो. आताही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पुन्हा मला उमेदवारी दिली आहे. मी आनंदी आहे. पदवीधरांचे प्रश्न मी मोठ्या नेटाने मांडेल. महायुतीच्या नेत्यांनी माझ्यावर विश्वास टाकून मला उमेदवारी दिली, याबद्दल महायुतीच्या नेत्यांचे मी आभार मानतो. त्यांचा विश्वास सार्थ ठरवेन, अशी ग्वाही देतो, असे उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सतीश चव्हाण म्हणा.

Back to top button