पैठणमध्ये भीषण अपघातात चिमुकलीसह तिघांचा मृत्यू
बस व दुचाकी वाहनामध्ये जोरदार धडक

छत्रपती संभाजीनगर/4 ऑक्टोबर : राज्य परिवहन महामंडळाची बस व दुचाकी वाहनामध्ये झालेल्या एका भीषण अपघातात पाच वर्षांच्या चिमुकलीसह तिघांचा मृत्यू झाला. ही घटना पैठण शहरातील नाका टू नाका या रस्त्यावर रविवारी दुपारी 3 च्या सुमारास घडली. कृष्णा अशोक गायकवाड (वय 25, रा. राक्षी ता. शेवगाव), छकुली कृष्णा गायकवाड (वय 5) व अशोक रमेश भालेराव (35 रा. अंतरवाली जालना) अशी मृतांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, कृष्णा गायकवाड आणि अशोक भालेराव हे दुचाकीवरून पैठण येथे आले होते. ते परत गावी जात असताना त्यांच्या दुचाकीची व बस धडक झाली. हा अपघात इतका भीषण होता की तिघांचाही जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.
अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी अवस्थेत तिघांनाही नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकार्यांनी दाखल केलेल्या तिघांनाही मृत घोषित केले. या घटनेमुळे नांदर आणि जालना परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अपघाताची नोंद करण्याची प्रक्रिया पोलिसात रविवारी रात्रीपर्यंत सुरू होती. पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.
पैठणच्या नाका टू नाका रस्त्यावर शक्यतो बांधकाम साहित्याच्या पुरवठादारांसह अन्य व्यावसायिकांची वाहने मोठ्या संख्येने वाहतूक करणारी असतात. यातील काही चालकांचे वाहन चालवणे अत्यंत बेदरकार असून वाहनतळालाही लावण्याचा प्रकारही अतिशय बेशिस्तीचा असल्याने अनेकवेळा वाहतुकीची कोंडी होते.





