तीन जातींचा ओबीसींमध्ये समावेश
राज्य सरकारचा ओबीसी प्रवर्गाबाबत महत्त्वाचा निर्णय

मुंबई /9 सप्टेंबर ; गेल्या काही दिवसापासून आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील वातावरण चांगलेच तापलेले असतानाच राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. मराठा समाजाच्या बांधवांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील उपोषण करत आहेत. जरांगे गेल्या 12 दिवसापासून आंतरवलीत आंदोलन करत आहेत. तर दुसरीकडे ओबीसी समाजाकडून देखील आरक्षणासाठी आंदोलन सुरू केलंय. त्याचदरम्यान राज्य सरकारनं ओबीसींबाबत मोठा निर्णय घेतलाय.
सरकारनं ओबीसीमध्ये अजून तीन जातींची समावेश करण्याचा निर्णय घेतलाय. राज्याचे ओबीसी मंत्री अतुल सावे यांनी विभागीय जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांना याबाबत सूचना दिल्या आहेत. त्यानुसार आता हिंदू वैश्य, हिंदू वाणी आणि हिंदू वैश्य वाणी या तीनही जाती एकच असल्याचे सांगत त्यांनी विभागीय जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांना महत्त्वाच्या सूचना दिल्यात. या निर्णयामुळे वैश्यवाणी जातीच्या नागरिकांना आता ओबीसी प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सरकारनामाच्या वृत्तानुसार, याआधी वैश्यवाणी समाजातील नागरिकांना ओबीसी प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र मिळण्यास खूप अडचणी येत. हिंदू वैश्य, हिंदू वाणी आणि हिंदू वैश्य वाणी या नावांमुळे जात प्रमाणपत्र आणि जात वैधतेच्या प्रक्रियेत निर्माण होणार्या अडचणी दूर करण्यासाठी स्पष्ट निर्देश देण्यात आलेत. राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालाचा दाखला देत मंत्री ओबीसी मंत्री अतुल सावे यांनी या तीन जातींचा एकच सामाजिक घटक असल्याचे स्पष्ट केलं.





