हृदयनाथ मंगेशकरांना जीवनगौरव

62 वा महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार सोहळा

राणी मुखर्जी-प्रसाद ओकचा विशेष सन्मान

मुंबई /9 सप्टेंबर  :मुंबईत नुकताच 62 वा महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार सोहळा पार पडला. यावेळी ज्येष्ठ गायक-संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकर यांना सन 2025चा चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सांस्कृतिक कार्यमंत्री ड. आशीष शेलार यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला.
ज्येष्ठ लेखक सलीम खान यांना जाहीर झालेला स्वर्गीय राज कपूर जीवनगौरव पुरस्कार त्यांच्या पत्नी आणि अभिनेत्री हेलन यांनी स्वीकारला. तर अभिनेता-दिग्दर्शक प्रसाद ओक याला चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. पुरस्कार स्वीकारताना प्रसाद ओकने हा सन्मान आपल्या दिग्दर्शकांना समर्पित केला. व्ही. शांताराम यांच्या 125व्या जन्मजयंती वर्षात आणि माझ्या 125व्या चित्रपटाच्या उंबरठ्यावर हा पुरस्कार मिळतोय. त्यामुळे माझी जबाबदारी आता आणखी वाढली आहे. महाराष्ट्र राज्य निर्मित पहिल्या मराठी सिनेमाचा मी नायक आहे. संत तुकडोची महाराज यांची व्यक्तिरेखा मी साकारतो आहे. माझी जबाबदारी आता अधिक वाढली आहे. हा पुरस्कार मी माझ्या सर्व दिग्दर्शकांना समर्पित करतो. माझे पहिले दिग्दर्शक अरुण सुर्वे ते प्रवीण तरडे, अनंत महादेवन., असं तो यावेळी म्हणाला.
दरम्यान, अभिनेत्री राणी मुखर्जीला स्वर्गीय राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कार स्वीकारताना राणीने महाराष्ट्राशी असलेलं आपलं भावनिक नातं व्यक्त केलं. महाराष्ट्र माझ्यासाठी फक्त एक राज्य नाही, तर माझी जन्मभूमी आणि कर्मभूमी आहे, असं ती म्हणाली.

Back to top button