एकाच कुटुंबातील चौघांची सामूहिक आत्महत्या

धावत्या ट्रेनसमोर उडी मारली; जळगाव हादरले

जळगाव /27 ऑगस्ट: जळगावमध्ये एकाच कुटुंबातील चौघांनी सामूहिक आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. आई-वडीलांनी दोन मुलांना घेऊन धावत्या ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवलं. या घटनेमुळे जळगाव हादरले. घटनेची माहिती मिळताच अमळनेर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. चौघांचे मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतले असून शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले आहे. पोलिस सध्या या सामूहिक आत्महत्या प्रकरणाचा तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगावच्या अमळनेर तालुक्यातील टकरेखेडा येथे आज पहाटे ही घटना घडली. सुनील अमृत भिल आणि त्यांची बायको पार्वती सुनील भिल यांनी आपल्या दोन चिमुकल्या मुलींसह रेल्वेसमोर उडी मारली. या घटनेत गंभीर जखमी झालल्या नवरा-बायकोसह दोन मुलींचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या शरीराचे अक्षरश: तुकडे झाले. आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. अमळनेर पोलिसांकडून घटनेचा पुढील तपास सुरू आहे.टाकरखेडा येथे राहणारे सुनील अमृत भिल हे बायको आणि दोन मुलींसह पहाटेच्या सुमारास घरातून बाहेर पडले होते. त्यानंतर धरणगाव ते अमळनेर रेल्वे स्थानकादरम्यान त्यांचे मृतदेह आढळून आले. गुरुवारी पहाटे पावणे पाच वाजताच्या सुमारास पश्चिम रेल्वेच्या अधिकार्‍यांनी अमळनेर पोलिसांना घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करत मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवले.

संबंधित बातम्या

Back to top button