राज्यात लवकरच ‘धर्मांतरबंदी कायदा’

मुंबई : प्रलोभने दाखवून किंवा बळजबरीने केल्या जाणार्या धर्मांत राच्या प्रकरणांना आळा घालण्या साठी राज्य सरकार आता कठोर पावले उचलण्याच्या तयारीत आहे. राज्यात लवकरच ‘धर्मांतरबंदी कायदा’ लागू करण्याचे संकेत गृहराज्यमंत्री (ग्रामीण) पंकज भोयर यांनी गुरुवारी विधानभवन परिसरात माध्यमांशी बोलताना दिले. धर्मांतराच्या तक्रारींची दखल घेत सरकार यासंदर्भातील कायद्याचा मसुदा आणि अंमलबजावणीबाबत गांभीर्याने विचार करत आहे. कोणाचेही नुकसान करण्याचा आमचा हेतू नाही, मात्र कायद्याचा धाक असणे आवश्यक आहे, असे भोयर म्हणाले. राज्यातील मदरशांमध्ये चालणार्या उपक्रमांबाबतही त्यांनी महत्त्वपूर्ण विधान केले. मदरशांमधील कामाची आणि तिथे घडणार्या प्रकारांची सखोल पडताळणी केली जाईल. त्यानंतर पुढील योग्य तो कायदेशीर निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.




