रा.काँच्या विलिनीकरणास ब्रेक?
माजी मंत्री धर्माराव बाबा आत्राम यांची उडी

मुंबई/4 फेब्रुवारी – दोन्ही राष्ट्रवादी पक्षांच्या विलीनिकरणाचा मुद्दा सध्या राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू बनला आहे. आतापर्यंत अजित पवार गट या चर्चांपासून बाजूला राहत होता, मात्र नुकतीच प्रक्रिया पुढे सरकण्यास सुरुवात झाली आहे. अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि विदर्भातील बडे नेते धर्मराव बाबा आत्राम यांनी विलीनिकरणासाठी काही अटी घाल ण्यास सुरुवात केली असून, या अटी मान्य झाल्या सच विलीनि कर णाची प्रक्रिया पूर्ण होईल असे संकेत मिळत आहेत. अजित पवार गटाचे नेते म्हणतात की, दोन्ही पक्षांच्या विलीनिकरणाबाबत अजितदादांनी आतापर्यंत कोणत्याही प्रकारची चर्चा केली नाही. धर्मराव बाबा आत्राम यांनीही सांगितले की, विलीनिकरणाची 12 फेब्रुवारी अशी ठराविक तारीख ठरलेली नव्हती; ठरले असते तर आम्हाला कळवले असते. दुसरीकडे शरद पवार गटाकडून असा दावा केला जात आहे की, अजितदादा आणि जयंत पाटील यांच्यात विलीनिकरणाबाबत चर्चा सुरू आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, अजितदादांनी विलीनिकरणाबाबत कोणतीही कल्पना दिलेली नाही, तसेच त्यांचे पक्ष अजूनही एनडीएचे घटक पक्ष असल्यामुळे ज्यांना आमच्यासोबत यायचे आहे, त्यांना एनडीएसोबत राहावे लागेल, ही अट त्यांनी ठेवलीय.धर्मराव बाबा आत्राम यांनीही विलीनिकरणासाठी तीन अटी ठरवल्या आहेत. त्यानुसार, या तीन अटी मान्य असतील तरच दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र येऊ शकतात.नेतृत्व सुनेत्रा ताईकडे: दोन्ही पक्ष विलीन झाल्यावर, सुनेत्रा ताई आमच्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष राहतील. शरद पवार गट विलीन झाल्यानंतर सुप्रिया सुळे यांचा रोल काय असेल हे ठरवले जाईल, परंतु नेतृत्व सुनेत्रा ताईकडे असेल.एनडीएसोबत राहणे: विलीनिकरण झाल्यास राष्ट्रवादी पक्ष एनडीए सोबत राहील आणि चिन्ह घडी असेल. शरद पवार गटाने या चिन्हाखाली विलीन होऊन सुनेत्रा ताई राष्ट्रीय अध्यक्ष राहतील.




