महिला आरक्षणावर चर्चा करणार

संसदेचे 3 दिवसीय विशेष अधिवेशन बोलवणार?; सरकारला टोला

नवी दिल्ली/2 एप्रिल– विधानसभा निवडणूक काळात संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये महिला आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता आहे. सरकार 3 दिवसांसाठी विशेष अधिवेशन बोलवण्याच्या तयारीत आहे. महिला आरक्षण विधेयकाची अंमलबजावणी करण्यासाठी लोकसभेच्या जागा वाढवण्याच्या उद्देशाने संसद एक विधेयक आणू शकते असे संकेत मिळत आहेत.एका अतिशय महत्त्वाच्या विधेयकासाठी सभागृह आज तहकूब करून लवकरच पुन्हा सुरू होईल असं संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी गुरुवारी राज्यसभेला माहिती दिली. येत्या 16, 17 आणि 18 एप्रिल रोजी संसदेचे विशेष अधिवेशन बोलावून यात महिला आरक्षणावर चर्चा होणार असल्याची चर्चा आहे. सरकारी योजनांवर राज्यसभेत काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यावर उत्तर देताना रिजिजू म्हणाले की, राज्यसभा आज आंध्र प्रदेश पुनर्रचना (सुधारणा) विधेयक आणि सार्वजनिक विश्वस्त (सुधारणा) विधेयक हाती घेतंय. संसदेच्या नियोजित अर्थसंकल्पीय अधिवेशनानुसार दुसर्‍या टप्प्याचा शेवटचा दिवस होता.आमच्याकडे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत. जे विरोधी पक्षासोबत चर्चा केलीआहे. पुढील 2-3 आठवड्यात आपल्याला एक महत्त्वाचे विधेयक आणायचं आहे. आज सरकार सभागृहाची बैठक स्थगित करेल परंतु लवकरच आपणपुन्हा भेटणार आहोत असं त्यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

Back to top button