पंतप्रधान मोदी म्हणाले सोने खरेदी करु नका

‘वर्क फ्रॉम होम’ पुन्हा सुरू करण्याचे आवाहन

हैदराबाद/10 मे: पश्चिम आशियातील सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (दि. 10) देशवासीयांना पेट्रोलियम उत्पादनांचा वापर अत्यंत संयमाने करण्यातचे आवाहन केले. तेलंगणामध्ये सुमारे 9,400 कोटी रुपयांच्या विकासकामांचे उद्घाटन करताना पंतप्रधानांनी इंधन बचतीवर भर दिला. भारत मोठ्या प्रमाणावर इंधन आयात करत असल्याने सध्याच्या परिस्थितीत संयम पाळणे ही ’काळाची गरज’ असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.आज पेट्रोल, गॅस आणि डिझेल यांसारख्या गोष्टींचा अत्यंत संयमाने वापर करणे ही काळाची गरज आहे. आपल्याला आयात केलेली पेट्रोलियम उत्पादने केवळ आवश्यकतेनुसारच वापरावी लागतील. यामुळे केवळ परकीय चलनच वाचणार नाही, तर युद्धाच्या प्रतिकूल परिणामांची तीव्रताही कमी होईल, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. पंतप्रधानांनी अक्षय आणि पर्यायी ऊर्जेच्या क्षेत्रात भारताने केलेल्या प्रगतीचाही उल्लेख केला. सौर ऊर्जा निर्मितीत भारत आज जगातील आघाडीच्या देशांपैकी एक आहे. तसेच, आयात इंधनावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रण करण्याच्या मोहिमेत भारताने अभूतपूर्व प्रगती केल्याचे त्यांनी सांगितले.कोरोना काळाचा उल्लेख करत पंतप्रधान मोदी म्हणाले, कोरोना काळात आपण वर्क फ्रॉम होम, ऑनलाईन मीटिंग्स आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची एक प्रभावी व्यवस्था विकसित केली होती. आजची परिस्थिती बघता, या व्यवस्था पुन्हा सुरू करणे, देश हिताचे ठरेल. तसेच, आपण इंधनाची बचत करून आपण देशाचे मौल्यवान परकीय चलन वाचवू शकतो, हे प्रत्येक नागरिकाचे उत्तरदायित्व आहे.
सरकारच्या बहुआयामी ऊर्जा धोरणावर बोलताना मोदी म्हणाले की, सरकारने प्रथम प्रत्येक घरापर्यंत ’एलपीजी’ पोहोचवण्यावर लक्ष केंद्रित केले आणि आता स्वस्त ’पाईप्ड गॅस’ पुरवठा वाढवण्याकडे लक्ष दिले जात आहे. याशिवाय, सीएनजी आधारित इकोसिस्टमलाही केंद्र सरकार सक्रियपणे प्रोत्साहन देत आहे.

संबंधित बातम्या

Back to top button