देशात आगामी जनगणनेसाठी अधिसूचना जाहीर

पहिल्यांदाच नोंदवली जाणार जात; 40 प्रश्न विचारले जाणार

नवी दिल्ली/14 ऑगस्ट ; देशातील आगामी जनगणनेसाठी केंद्र सरकारने 40 प्रश्नांची अधिकृत यादी जाहीर केली आहे. महत्वाचे म्हणजे, या जनगणनेदरम्यान पहिल्यांदाच जातीशी संबंधित माहितीही विचारली जाणार आहे. याशिवाय, कौटुंबिक माहिती, शिक्षण, रोजगार, एवढेच नाही तर कोविड लसीकरणाची माहितीही विचारली जाणार आहे. देशाचे रजिस्ट्रार जनरल मृत्युंजय कुमार नारायण यांच्या आदेशानुसार, जम्मू-कश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड राज्यांतील बर्फाच्छादित भागांत 1 ते 30 सप्टेंबर दरम्यान जनगणना प्रक्रिया पार पडेल. प्रत्यक्ष घरोघरी जाऊन माहिती गोळा करण्यापूर्वी नागरिकांसाठी 17 ते 31 ऑगस्ट दरम्यान ’सेल्फ एन्यूमेरेशन’ अर्थात स्वतःच माहिती भरण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे. तसेच, देशाच्या उर्वरित भागांमध्ये पुढील वर्षी जनगणना सुरू होईल. हे महत्वाचे प्रश्न विचारले जाणार?
जनगणनेदरम्यान, वैवाहिक स्थिती, लग्नाच्या वेळेचे वय, पती/पत्नीचे नाव, धर्म, जात, आई-वडील यांची माहिती, अपंगत्व आणि मातृभाषेसह इतर भाषांचे ज्ञान, साक्षरता, डिजिटल साक्षरता, सर्वोच्च शैक्षणिक पात्रता, गेल्या वर्षभरातील आर्थिक कामे, जन्मस्थान, कोविड लस घेतली आहे की नाही आदी प्रश्न विचारले जाणार आहेत.

संबंधित बातम्या

Back to top button