बिसलेरीच्या पाण्यामुळे कॅन्सरचा धोका? कोर्टात खटला चालवण्यास एफएसएसएची मंजुरी

नवी दिल्ली/23 नोव्हेंबर : प्रवास असो, बाहेर पडल्यानंतर असो किंवा घर-कार्यालयात मोठमोठे कार्यक्रम असो आपण नेहमी बिसलेरीच्या पाण्यासाठी आग्रही असतो. पण, शुद्ध म्हणवणार्‍या हेच बिसलेरीचे पाणी स्वच्छतेच्या परीक्षेत नापास झाल्याचे समोर आले आहे. बिसलेरीच्या बाटलीबंद पाण्याचा नमुना प्रयोगशाळेतील दोनही तपासण्यांमध्ये पिण्यासाठी असुरक्षित आढळला आहे. या प्रकरणी भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण अर्थात एफएसएसए ने कंपनीविरोधात कायदेशीर खटला चालवण्यास मंजुरी दिली आहे. नमुन्यात निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त ब्रोमेट आढळले. त्यानंतर एफएसएसए कायदा 2006 अंतर्गत तो असुरक्षित घोषित करण्यात असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. दरम्यान, बिसलेरी कंपनीकडून याबाबत एक स्पष्टीकरण आले आहे. पिण्याचे पाणी पूर्णपणे सुरक्षित असून एफएसएसए मधील हे प्रकरण सुमारे 14 महिने जुने आहे, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

Back to top button