अमेरिका-इराण-इस्रायल युद्धाचा शेकडो विमानांना फटका

हजारो प्रवासी अडकले; अनेक उड्डाणे रद्द

नवी दिल्ली/1 मार्च -अमेरिका आणि इस्रायलनेइराणवर संयुक्त लष्करी कारवाई केल्यानंतर अनेक आखाती देशांनी सुरक्षिततेच्या कारणास्तव आपले हवाई क्षेत्र तात्पुरते बंद केले आहे. यामुळे देशातील प्रमुख विमानतळांसह मुंबई विमानतळावरील विमान उड्डाणे रद्द केली आहेत. इराण-इस्रायल युद्धामुळे जगभरातील हवाई वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. विमानांची वाहतूक कोलमडल्याने विमानतळांवर हजारो प्रवासी अडकले आहेत.
अण्वस्त्रनिर्मिती रोखण्यासाठी करार करण्याकरिता चर्चेच्या तीन फेर्‍या अपयशी ठरल्यानंतर अमेरिका आणि इस्रायलने शनिवारी इराणवर जोरदार हल्ले चढविले. या हल्ल्यात इराणमध्ये 200 पेक्षा अधिक जण ठार झाले. या हल्ल्यांना प्रत्युत्तर देत इराणने इस्रायलसह आठ देशांवर प्रतिहल्ले केले. अद्यापही अनेक ठिकाणी हल्ले सुरूच आहेत. मध्य पूर्वेतील देशांमधील तणाव वाढताना पाहायला मिळत आहे. यातच विमान उड्डाणे रद्द झाल्याने हजारो लोकांना त्याचा फटका बसल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबईहून लंडन, न्यूयॉर्क, शिकागो, टोरंटो, फ्रँकफर्ट आणि पॅरिसला जाणारी रविवार-सोमवारची एअर इंडियाची सर्व उड्डाणे रद्द केली होती. एअर इंडियाने अडकलेल्या भारतीय कर्मचार्‍यांना सुखरूप बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. दुसरीकडे इंडिगोनेही पश्चिम आशिया आणि काही आंतरराष्ट्रीय क्षेत्रांतील उड्डाणे रद्द करण्यात निर्णय घेतला आहे. याचा परिणाम मुंबई-लंडन सेवेवरही झाला आहे. दिल्लीहून तेल अवीवला जाणारे एअर इंडियाचे विमान मध्यमार्गाने रविवारी मुंबईला उतरविण्यात आले. बहरीनमार्गे अमेरिकेला जाणारे प्रवासी रीबुकिंगबाबत माहिती न मिळाल्याने संभ्रमात असल्याचे म्हटले जात आहे. मुंबईहून मक्का-मदीनाला उमरासाठी जाणारे प्रवासीही अडकले आहेत. याशिवाय अबू धाबी, बहरीन आणि इटलीला जाणारे प्रवासी खोळंबले आहेत. मुंबई बाहेरुन आलेल्या प्रवाशांची सोय विमान कंपन्यांनी केली आहे. प्रवाशांचे हाल उड्डाणे रद्द झाल्याने मुंबई विमानतळ अनेक प्रवासी अडकून पडले आहेत. मुंबई विमानतळावरुन अमेरिका आणि युरोपला जाणारी उड्डाणे रद्द केली आहेत. दरम्यान, सोमवारपर्यत उड्डाणे रद्द एअर इंडियाने रविवारी, दिल्ली, मुंबई आणि अमृतसरहून लंडन, न्यूयॉर्क, नेवार्क, शिकागो, टोरंटो, फ्रँकफर्ट आणि पॅरिसला जाणार्‍या सेवा रद्द केल्या होत्या. तसेच, इंडोगोकडूनही पश्चिम आशिया आणि काही आंतरराष्ट्रीय क्षेत्रांमध्ये जाणारे उड्डाणे रद्द केली होती. भारतीय हवाई कंपन्यांनी सोमवार, 2 मार्चपर्यंत या प्रदेशातील सर्व उड्डाणे रद्द केली आहेत. एअर इंडिया एक्स्प्रेस, अकासा एअर आणि स्पाइसजेट यांनी मध्यपूर्वेतील उड्डाणे रद्द किंवा स्थगित केल्याचे सांगितले जात आहे.

संबंधित बातम्या

हे सुद्धा वाचा
Close
Back to top button