हरिश राणाचा एम्समध्ये मृत्यू

नवी दिल्ली/24 मार्च -13 वर्षात कोमात असलेल्या हरिश राणाचं दिल्लीच्या एम्स रुग्णालयात निधन झालं. सुप्रीम कोर्टाकडून पॅसिव्ह युथेनेशिया म्हणजेच इच्छामरणाची परवानगी मिळाल्यानंतर हरिशला पॅसिव्ह युथेनेशियासाठी एम्समध्ये दाखल करण्यात आलं होतं. प्रक्रियेनुसार, नियमांतर्गत लाइफ सपोर्ट हळूहळू हटवण्यात येत होते. 10 डॉक्टरांचं पथकाच्या देखरेखीखाली ही संपूर्ण प्रक्रिया पार पडली. पीटीआयनं सूत्रांच्या हवाल्यानं हरिश राणाचं निधन झाल्याची माहिती दिली. हरिश राणाला एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. हरिशला सन्मानानं इच्छामरण मिळावं असे प्रयत्न या प्रक्रियेअंतर्गत करण्यात आले. तसेच यावेळी त्याच्या कुटुंबीयांचेही काउंसिलिंग करण्यात येत होते, अशीही माहिती देण्यात आली. गाझियाबादचा हरिश राणा हा 13 वर्षांहून अधिक काळ कोमात होता. सुप्रीम कोर्टाकडून पॅथिव्ह युथेनेशिया म्हणजेच इच्छामरणाची परवानगी मिळाली होती. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थानच्या (एम्स) पॅलिएटिव्ह केअर वॉर्डात हरिशला दाखल करण्यात आले होते. दहा डॉक्टरांच्या पथकाच्या देखरेखीखाली ही संपूर्ण प्रक्रिया करण्यात आली.
डॉक्टरांच्या पथकाने प्रक्रियेतील नियमानुसार, हळूहळू लाइफ सपोर्ट हटवण्याची प्रक्रिया सुरू केली होती. सूत्रांच्या माहितीनुसार, पोषण ट्यूबच्या मदतीने दिले जाणारे अन्न बंद करण्यात आले होते. त्यानंतर पाणीही देणं बंद करण्यात आलं होतं.तत्पूर्वी, एम्स प्रशासनानं विशेषज्ञ डॉक्टरांची एक समिती यासाठी नेमली होती. ही समिती या संपूर्ण प्रक्रियेवर लक्ष ठेवून होती. डॉक्टरांच्या माहितीनुसार, रुग्ण हा कोमात असल्यामुळं त्याला कोणताही त्रास किंवा अस्वस्थ वाटत नव्हते. रुग्णालय व्यवस्थापनाकडून हरिशच्या कुटुंबीयांना दररोज त्याच्या प्रकृतीबाबत माहिती दिली जात होती. तसेच त्यांचे काउंसिलिंगही करण्यात येत होते.

संबंधित बातम्या

Back to top button