उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भाजपविरोधात मवाळ भूमिका

पिंपरीतील नगरसेवक संभ्रमात

गडचिरोली/25 नोव्हेंबर  : आलापल्ली वनपरिक्षेत्रातील 2023-24 आणि 2024-25 या दोन आर्थिक वर्षांतील जिल्हा वार्षिक योजना आणि आदिवासी उपयोजनेंतर्गत करण्यात आलेल्या 47 कामांच्या चौकशीत निकृष्ट साहित्याचा वापर, अंदाजपत्रक आणि प्रत्यक्ष कामातील तफावत, मोजमाप पुस्तिकांमधील त्रुटी तसेच प्रशासकीय अनियमितता चौकशी अहवालात उघड झाल्या आहेत. या प्रकरणी तत्कालीन वनपरिक्षेत्र अधिकारी गौरव गणवीर यांच्याविरुद्ध विभागीय चौकशीची शिफारस करण्यात आली आहे. मात्र, प्रशासनाकडू न अद्याप या अहवालावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. विशेष म्हणजे, या कामांचे तांत्रिक मूल्यमापन करणारे अभियंते आणि प्रत्यक्ष कामे करणार्‍या कंत्राटदारांना अहवालात अभय देण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Back to top button