कारची समोरासमोर धडक; दोघे ठार

अपघातग्रस्त कारमध्ये पोलिसांना सापडला चक्क 27 किलो गांजा

बुलढाणा/1 नोव्हेंबर – मुंबई-नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 56 वर खामगाव नजीक आज सकाळच्या सुमारास ट्रक आणि कारचा समोरासमोर धडकून भीषण अपघात झालाय. या अपघातात कारमधील दोघेजण जागीच ठार झाले आहेत. सतीश सखाराम जाधव (परभणी ) व सय्यद फिरोज सय्यद मेहमूद अशी मृतकांची नावे असून पोलिसांनी तपासणी केली असता अपघातग्रस्त कारमध्ये पोलिसांना चक्क 14 लाख रुपये किमतीचा 27 किलो गांजा ) आढळलाय. या प्रकरणी पोलिसांनी कारसह 27 किलो गांजा जप्त केला असून दोन्ही मृतकांवर एनडीपीएस अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे. मात्र हा गांजा नेमका कुठे आणि कुणाच्या सांगण्यावरून नेण्यात येत होता, याचा देखील तपास आता पोलीस करत आहेत.

Back to top button