बडनेरातील सावता चौकात युवकाची निर्घृण हत्या

12 जणांनी मिळून हत्या केल्याचा आरोप

जुनीवस्ती सावता मैदानात थरारक घटना

रेल्वेत खाद्यपदार्थ विक्रीवरुन वाद विकोपास

अमरावती /26 नोव्हेंबर : सावता मैदानात काल मध्यरात्री ऋषी खापेकर (27) यांची जुन्या वैमनस्यातुन निर्घृण हत्या करण्यात आली होती. हत्येनंतर आज सकाळी परिस्थिती तणावपूर्ण बनली. या प्रकरणात तब्बल 12 जणांनी मिळून हल्ला केल्याचा आरोप मृतकाच्या कुटुंबीयांनी आणि परिसरातील नागरिकांनी केला. सर्व आरोपींना अटक न झाल्यापर्यंत मृतदेहाचा अंत्यसंस्कार न करण्याचा निर्णय त्यांनी घेतल्याने पोलिस ठाण्यात मोठी गर्दी झाली.
काही युवकांनी सावता मैदानासमोरील बडनेरा मार्गावर मार्ग अडवून आंदोलन केले या प्रसंगी मृतकाच्या आरोपींना तात्काळ अटक करण्याच्या मागणीकरीता शंभर ते दिडशेच्या वर महिला पुरूष पोलिस स्टेशनमध्ये दाखल झाले होते. तसेच वाढत्या तणावामुळे
राज्यसभा सदस्य डॉ. अनिल बोंडे बडनेरा पोलिस ठाण्यात पोहोचले त्याप्रसंगी
डी.सी.पी. गणेश शिंदे श्याम घुगे व वरिष्ठ अधिकार्‍यांशी चर्चा केली. यावेळी भाजप प्रवक्ते शिवराय कुलकर्णीसह भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थित होते. मंगळवार, 25 नोव्हेंबरच्या मध्यरात्री सावता मैदानात 10 ते 12 युवकांनी ऋषी खापेकर यांना घेरून मारहाण केली आणि चाकूने भोसकून हत्या केली. घटनेचे दृश्यफीत पोलिसांसह नागरिकांकडेही उपलब्ध आहे. दृश्यफीतमध्ये काही महिला सहभागी असल्याचेही दिसून येते.
बुधवार, 26 नोव्हेंबरच्या सकाळी 11 वाजता मोठ्या संख्येने नागरिक बडनेरा पोलिस ठाण्यात जमा झाले. पोलिसांनी तीन अल्पवयीनांसह चौघांना अटक केली, मात्र नागरिकांचे म्हणणे आहे की हल्लेखोरांची संख्या 10 ते 12 होती आणि अनेक आरोपी बाहेरगावचे आहेत. म्हणून सर्व आरोपींना अटक केल्याशिवाय अंत्यसंस्कार न करण्याचा निर्णय कुटुंबीयांनी कायम ठेवला. या पार्श्वभूमीवर डॉ. अनिल बोंडे यांनी पोलिस उपायुक्त गणेश शिंदे, निरीक्षक शाम घुगे, सहाय्यक पोलिस आयुक्त कैलास पुंडकर व ठाणेदार सुनील चव्हाण यांच्याशी चर्चा करून फरार आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी केली. बडनेरा शहरात दिवसेंदिवस गंभिर होण्याच्या मालीका सातत्त्याने सुरु आहे. या गंभीर बाबीकडे गांभीर्याने लक्ष घालन्याची गरज आहे. हत्या सारख्या गंभीर गुन्ह्यामध्ये अल्पवयीन आरोपींचा सहभाग मोठ्या प्रमाणात दिसुन येतो हा चिंतेचा विषय आहे.
पोलिसांवर निष्क्रियतेचा आरोप; परिसरात तणाव-मुख्य आरोपींना न पकडता अल्पवयीनांना अटक केल्याने नागरिकांनी पोलिसांच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली असून भाजप प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांनी हल्ला बाहेरून आलेल्या युवकांनी केल्याचा आरोप केला आहे. दरम्यान, वाढत्या तणावामुळे बडनेरा पोलिस ठाण्याने अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला असून मृतकाच्या नातेवाईकांसह सामाजिक संस्थांनी सर्व आरोपींना त्वरित अटक करून कठोर कारवाईची मागणी केली आहे.

संबंधित बातम्या

Back to top button