तणावमुक्त जीवनासाठी स्माईल मेडिटेशन साधना आवश्यक
डॉ.पंकज जैन यांचे प्रतिपादन

ट्राय ओरिजिन स्माईल फाउंडेशनतर्फे नॅशनल सायंटिफिक सेमिनार व भव्य आरोग्य शिबिर संपन्न
अमरावती/12 जून: बदलत्या जीवनशैलीमुळे वाढलेला तणाव, मानसिक अस्वस्थता आणि विविध शारीरिक व्याधींवर मात करण्यासाठी ’स्माईल मेडिटेशन’ ही एक प्रभावी आणि नैसर्गिक उपचार पद्धती ठरत आहे. ’ट्राय ओरिजिन स्माईल फाउंडेशन’ आणि ’स्माईल मेडिटेशन अकॅडमी’ यांच्या संयुक्त विद्यमाने संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे आयोजित नॅशनल सायंटिफिक सेमिनारमध्ये तज्ज्ञांनी हा कानमंत्र दिला. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने झाली, तर दक्षिण कोरियाचे वैज्ञानिक प्रा. पार्क जे वू यांच्या प्रतिमेला अभिवादन करून उपचारांचा श्रीगणेशा करण्यात आला.
ध्यान, मुद्रा चिकित्सा आणि आधुनिक विज्ञानाचा संगम साधून ही पद्धत विकसित करण्यात आली आहे. शरीर, मन आणि भावनांमध्ये सुसंवाद निर्माण करून वैयक्तिक विकासासाठी ही साधना अत्यंत उपयुक्त आहे. विविध मुद्रांच्या साहाय्याने शरीरातील ऊर्जा बिंदूंना जागृत करून आजारांच्या मूळ कारणांवर उपचार केले जातात. यावेळी आयोजित आरोग्य शिबिरात देशभरातून आलेल्या प्रशिक्षित स्माईलर्सनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यात मनप्रीत कौर, अन्नू नरेश, दलजीत कौर, दीपा विचारे, कुलदीप राजोरा, मोहित चौधरी, निता टांक, राजेंद्र पवार, सारिका जैन, मेघा देशपांडे-त्रिपाठी, राखी मिश्रा, सुनीता साळुंखे, सरिता कुमार, अंतरा चौधरी आणि प्रणाली पटेल यांचा समावेश होता. एक हजारांहून अधिक नागरिकांनी लाभ घेतलेल्या या शिबिरात अक्युप्रेशर, अक्युपंक्चर, चक्र-नाडी उपचार, योगासने आणि स्माईल ब्रिदिंग यांसारख्या नैसर्गिक पद्धतींचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. उपचारांनंतर उपस्थितांच्या चेहर्यावर उमटलेले समाधान या शिबिराच्या यशाची साक्ष देत होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनप्रीत कौर यांनी केले, सूत्रसंचालन राखी मिश्रा यांनी केले, तर आभार वैशाली बोरकर यांनी मानले. उपक्रम यशस्वी करण्यासाठी वैशाली बोरकर, नीलिमा भाटकर, विशाल सोमकुवर, वर्षा पेरके, शीतल देशमुख, कविता पिंपळे, दीपा ढोणे, अमृता जाजू, माया आसव, लीना डांगरे, दीपक कडव, आशिष राठी, शीतल कडू, मिलिंद तायडे, प्रीती गावंडे, स्वागता, साक्षी देशमुख, शिल्पा देशमुख, मोनिका बडनेरे, प्रांजली विघे, प्रणिता शेंदुरकर, जयश्री गुलाबराव, मालती दावरे, अनिशा कामदार, प्रतीक चिमणकर, मानसी भयाणी, मालू ठाकरे, मीना बुधे, मिनाक्षी सिंग, कविता लातुरे, मनीषा कारमोरे, नेहा पाटील आणि वैशाली शिंगणे आदींनी मोलाचे योगदान दिले.
आरोग्यदायी मुद्रा उपचारांचा लाभ
स्माईल मेडिटेशनमुळे मानसिक, भावनिक आणि कौटुंबिक जीवनात समृद्धी येते. शरीरातील विविध ऊर्जा बिंदूंना सक्रिय करून हे ध्यान मन:शांती आणि आरोग्य प्रदान करते. 1,000 पेक्षा जास्त नागरिक या नैसर्गिक उपचार पद्धतीमुळे लाभान्वित झाले असून, दैनंदिन जीवनातील तणाव दूर करण्यासाठी हे एक उत्तम साधन ठरत आह




