अल्पवयीन युवकाचा ट्रॅक्टर चालवितांना अपघाती मृत्यू

बेनोडा (शहीद) जवळील टेंभणी शेतशिवारातील दुर्दैवी घटना

वरुड /12 जून- बेनोडा (शहीद) पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या टेंभणी शेतशिवारातील प्रमोद धुर्वे यांचे शेतात आज ट्रॅक्टर ने बेड पाडण्याचे काम सुरु असतांना शेतातील नालीमध्ये ट्रॅक्टरचा चाक गेल्याने ट्रॅक्टर पलटुन अल्पवयीन ट्रॅक्टर चालक युवकाचा ट्रॅक्टरखाली दबुन घटनास्थळीच मृत्यु झाल्याची घटना आज 12 जुन रोजी सकाळचे सुमारास घडली.
प्राप्त माहितीनुसार, प्रमोद दौलतराव धुर्वे रा. शिंगोरी यांचे टेंभणी शेत शिवारात शेत आहे. त्यांनी आज शेतामध्ये बेड पाडण्याचे काम करण्यासाठी गणेश सदाशिवराव धुर्वे रा.काचुर्णा यांचे ट्रॅक्टर भाडयाने सांगीतले होते. त्यानुसार आज सकाळचे सुमारास अल्पवयीन मुलगा वय 16 वर्ष रा. काचुर्णा नामक ट्रॅक्टर घेउन प्रमोद धुर्वे यांचे शेतात पोहचला आणि शेतात बेड पाडण्याचे कामाला त्याने सुरुवात केली. याच दरम्यान सकाळी 9:30 वाजता ट्रक्टरचे एक चाक शेतातील नालीमध्ये गेल्याने ट्रॅक्टर चालक ट्रॅक्टर वरील नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर पलटी झाला आणि याच ट्रॅक्टरखाली दबुन नामक अल्पवयीन चालकाचा घटनास्थळीच मृत्यु झाला. दरम्यान आजु – बाजुच्या शेतातील नागरीकांनी घटनास्थळी धाव घेउन चालकाचा चा मृतदेह ट्रॅक्टर बाहेर काढून या घटनेची माहिती बेनोडा (शहीद) पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र काळे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक ललीत तायडे, हे.कॉ.निलेश डफडे यांनी घटनास्थळ गाठुन पंचनाम्याअंती चालकाचा मृतदेह वरूड ग्रामिण रुग्णालयात रवाना केला असुन पुढील तपास बेनोडा (शहीद) पोलीस करीत आहे.

संबंधित बातम्या

Back to top button