चिखलदर्याच्या विकासाला गती देणार
निर्विरोध विजयी आल्हाद कलोती यांचे प्रतिपादन

चिखलदरा /20 नोव्हेंबर – विदर्भातील एकमेव निसर्गरम्य थंड हवेचे ठिकाण असूनही अपेक्षित विकासापासून दूर राहिलेल्या चिखलदर्यात आता विकासाला सर्वाधिक प्राधान्य दिले जाणार आहे. नागरिकांच्या विश्वासाच्या बळावर मिळालेल्या निर्विरोध विजयानंतर ही जबाबदारी अधिक जाणवते, अशी भावना भाजपचे नगरसेवक आल्हाद कलोती यांनी व्यक्त केली. दैनिक आपली मातृभूमी शी संवाद साधताना कलोती म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूर दृष्टीतून चिख लदरा अधिक विकसित कर ण्याचे उद्दिष्ट आहे. येथे असे आकर्षक प्रकल्प राबवले जातील की विदर्भासह शेजारील प्रांतांतील पर्यटकही येथे येण्यासाठी उत्सुक होतील, असे त्यांनी सांगितले.
कलोती पुढे म्हणाले की, चिखलदर्यातील जनता विकासासाठी आतुर आहे, याची पुष्टी आजच्या निकालातून मिळाली आहे. माझे तिन्ही प्रतिस्पर्धी मागे हटल्याने जनतेचा आमच्यावरील विश्वास अधोरेखित झाला आहे. हा निकाल मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वावरील दृढ विश्वासाचा पुरावा असल्याचेही त्यांनी नमूद केले. भाजपकडे चिखलदरा पर्यटनस्थळासाठी सर्वसमावेशक विकास आराखडा तयार आहे. पायाभूत सुविधा उभारणी, पर्यटन सुविधांचा विस्तार आणि आकर्षक प्रकल्प राबवून चिखलदरा हे विदर्भाचे नंदनवन अधिक खुलवण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.जलपुरवठा सुधारण्यासाठी सुरू असलेल्या योजनेचा लवकरच लाभ नागरिकांना मिळणार असून शुद्ध पेयजल उपलब्ध खलदर्याच्या विकासाला गती …
होईल. परिसरातील शैक्षणिक सुविधांची कमतरता दूर करून विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षणाची उपलब्धता सुनिश्चित केली जाईल, असेही कलोती यांनी सांगितले.विजयाचे श्रेय विचारता ते म्हणाले की, पहिले श्रेय चिखलदर्यातील जनतेचे आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार नवनीत राणा, माजी मंत्री प्रवीण पोटे-पाटील, आमदार केवलराम काले, जिल्हाध्यक्ष प्रभुदास भिलावेकर आणि युवक स्वाभिमानचे आमदार रवि राणा यांच्या सहकार्यामुळे हा ऐतिहासिक निर्विरोध विजय शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले.
विकासाचाच अजेंडा मुख्य – आल्हाद कलोती-चिखलदर्याच्या अपेक्षित विकासाला गती देणे हेच आमचे प्राधान्य असून त्यामुळेच माझी निर्विरोध निवड झाली, असे भाजपचे नवनिर्वाचित नगरसेवक आल्हाद कलोती यांनी सांगितले. दैनिक आपली मातृभूमीशी संवादात त्यांनी आपल्या विजयाचे श्रेय चिखलदर्यातील नागरिकांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जिल्ह्यातील भाजप नेतृत्वाला दिले. कलोती म्हणाले की, चिखलदर्यातील लोक विकासासाठी आतुर आहेत. जलपुरवठा सुधारणा, शैक्षणिक सुविधा वाढविणे, पर्यटनाला चालना देणे आणि पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी सर्वसमावेशक नियोजन तयार आहे. चिखलदरा हे विदर्भातील प्रमुख निसर्गस्थळ अधिक आकर्षक बनविण्यासाठी विविध प्रकल्प राबवण्यात येतील, असे त्यांनी स्पष्ट केले.




