खरात, चाकणकर यांच्या फोटोला चपलेने बदडले
रूपाली चाकणकर यांच्या अटकेसाठी महिला काँग्रेस आक्रमक

* निवासी जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन
अमरावती / 23 मार्च – भोंदु बाबा अशोक खरात याने असंख्य महिलांना फसवून व त्यांच्यावर अत्याचार करुन त्यांना ब्लॅकमेल केलं.अशा भोंदु खरात याला राज्य महिला आयोगाच्या तत्कालीन अध्यक्ष रूपाली चाकणकर यांच अभय होत. त्यामुळे चाकणकर सुध्दा या प्रकरणात तितक्याच जबाबदार असल्यामुळे त्यांनाही तत्काळ अटक करावीं अशी मागणी महिला काँग्रेसच्या शहर अध्यक्ष जयश्री वानखडे यांच्या नेतृत्वात नगरसेवक डॉ. अर्चना आत्राम, रश्मी जटाले, आरती पिंपळे, सीमा तिवारी, किरण चांदवडकर, भारती क्षीरसागर, शेख शाहीन, वंदना निरगुडे, रंजना घोगरे, मालती घोगरे, भारती निकम, निलीमा मोहोड यांनी आंदोलन करून या आशयाचे निवेदन निवासी जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.
भोंदु अशोक खरात यांच्या महिलांना फसवून त्यांच्यावर करण्यासोबतच ब्लॅकमेलिंग प्रकरणावरून महिला काँग्रेसने. आक्रमक पवित्रा घेतला आहे. सोमवारी याचा निषेध करण्यासाठी जिल्हाधकारी कार्यालय परिसरात महीला काँग्रेसच्या शहर अध्यक्ष जयश्री वानखडे यांच्यासह नगर सेविका डॉ अर्चना आत्राम वंदना निरगुडे, सीमा तिवारी, आरती पिंपळे,राजश्री जाठाळ, भारती शिरसागर, किरण चांदवडकर यांच्यासह नारीशक्ती एकवटली होती, त्यावेळी भोंदु खरात हा एकटाच या प्रकरणात नाही तर सत्ताधारी पक्षातील अनेक बडे नेते आणि काहीं मंत्री सुध्दा सहभागी असल्याचा आरोप करण्यात आला. तसेच खरात हा महिला आयोगाच्या तत्कालीन अध्यक्ष रूपाली चाकणकर यांचा गुरू असल्याचे अनेक पुरावे आणि काही व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाले आहेत. यावरून खरात याचे व चाकणकर यांचे किती निकटचे संबंध होते हे आता सूर्य प्रकाशा सारखे सुस्पश्ट झाले आहे. इतकं सारं होऊन सुध्दा चाकणकर यांनी स्वतः हुन राजीनामा दिला नाही तर तो घ्यावा लागला या पेक्षा काय शोकांतिका असु शकते असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला.हा सर्व घटनाक्रमावरून या लज्जास्पद प्रकरणात चाकणकर यांची सक्रीय भुमिका राहिली आहे. भोंदू खरात करीत असलेल्या सर्व प्रकाराची माहीत चाकणकर यांना होती. परंतु महिलांवर असे अत्याचार होत आहे हे माहीत असून सुद्धा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष म्हणून त्यांनी कोणतीच दखल घेतली नाही, यां उलट आपल्या भोंदू गुरूला पुर्णपणे मदत केली. यावरून चाकणकर हया सुध्दा यात सहभागी असल्यामुळे त्यांना तत्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
खरात,चाकणकर यांच्या फोटोला चपलेने बदडले-आत्याच्यारी भोंदु खरात याच्या लज्जास्पद प्रकार आणि याला रूपाली चाकणकर यांचे असलेले अभय यावरून महिला काँग्रेस कमिटीने आक्रमक पवित्रा घेत जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात घोषणाबाजी करुन चाकणकर यांना त्वरीत अटक करा अशी मागणी करीत खरात व चाकणकर यांच्या फोटोला चपलेने बदडून आपला संताप व्यक्त केला.
महिला आयोगाने किती महिलांना न्याय दिला-रुपाली चाकणकर ह्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष असतांना त्यांनी किती महिलांना न्याय मिळवून दिला हे जाहीर करावं. त्याचप्रमाणे बदलापूर प्रकरणासह अनेक महिला अत्याचार प्रकरणात त्या कधीच पुढे आल्या नाहीत. मात्र भोंदू अशोक खरात यांच्या लीलांचे बिंग फुटले आणि ते सर्व राज्यात व्हायरल झाल्यानंतरही चाकणकर यांचा भोंदू खरात सोबत निकटचा संबंध आहे. हे स्पष्ट असतांना सुध्दा त्यांनी राजीनामा दिला नाही. अखेर तो त्यांच्याकडून घेण्यात आला. अशी संतप्त प्रतिक्रीया जयश्री वानखडे यांनी दिली.




