मुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवारांची गुप्त बैठक

नाराज एकनाथ शिंदे अमित शहांच्या भेटीला

मुंबई /19 नोव्हेंबर : राज्यात सत्ताधारी महायुतीत सर्व काही आलबेल नसल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जागावाटपावरून महायुतीत वादाची ठिणगी पडली असून, या वादाचा भडका बुधवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत पाहायला मिळाला. नाराजी व्यक्त करण्यासाठी शिवसेनेच्या शिंदे गटाच्या सर्वच मंत्र्यांनी या मंत्रिमंडळ बैठकीकडे पाठ फिरवली होती.
या शक्तिप्रदर्शननंतर लगेचच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या मंत्र्यांसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि महायुतीतील आपली तीव्र नाराजी व्यक्त केली. नाराजी दूर करण्यासंदर्भात दोन्ही नेत्यांकडून चर्चा झाली असली, तरी शिंदे गटाचे समाधान झाले नसल्याचे संकेत मिळत आहेत. कारण, फडणवीस यांच्या भेटीनंतर अवघ्या दोनच दिवसांनी म्हणजेच आज, एकनाथ शिंदे थेट दिल्लीसाठी रवाना झाले. दिल्लीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने आणि महायुतीतील जागावाटपावरून निर्माण झालेल्या तणावावर या दोन नेत्यांमध्ये निर्णायक चर्चा झाली. या दिल्लीवारीमुळे महायुतीतील राजकीय घडामोडींना आता वेग आला आहे.उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या दिल्लीत दाखल झाले आहेत. दिल्लीत त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह वरिष्ठ भाजप नेत्यांची भेट घेऊन राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील वादावर चर्चा केली. दिल्लीतील भेटीगाठी संपल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बिहार दौर्‍याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या दौर्‍याला विशेष महत्त्व आहे, कारण बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी एकनाथ शिंदे यांनी बिहारमध्ये जाऊन दोन सभा घेतल्या होत्या. बिहारमध्ये एनडीए आघाडीच्या विजयाबद्दल अभिनंदन करण्यासाठी एकनाथ शिंदे बिहारला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. हा दौरा राष्ट्रीय स्तरावर एनडीएच्या घटकांशी असलेले आपले संबंध अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने महत्त्वाचा ठरू शकतो. महायुतीतील वाद आणि जागावाटपाच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, एकनाथ शिंदे यांचा दिल्ली आणि त्यानंतरचा बिहार दौरा राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

संबंधित बातम्या

Back to top button