आल्हाद कलोती निवडणुकीच्या मैदानात
चिखलदर्याच्या विकासासाठी उमेदवारी दाखल

* आल्हाद कलोती यांच्या उमेदवारीला युवा स्वाभिमान पार्टीचा जाहीर पाठिंबा
अमरावती /15 नोव्हेंबर – चिखलदर्याच्या राजकीय इतिहासात महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून कलोती परिवारातील आल्हाद कलोती यांनी यंदाच्या निवडणुकीत पहिल्यांदाच उमेदवारी दाखल करत चिखलदर्याच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास जाहीर केला आहे. कलोती परिवाराने गेल्या अनेक वर्षांत केलेल्या सामाजिक, शैक्षणिक आणि विकासात्मक कार्याची भक्कम पार्श्वभूमी आल्हाद कलोती यांना मिळाली असून त्यांच्या उमेदवारीला स्थानिक जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून येत आहे.
अंध विद्यालय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रासाठी विविध सामाजिक उपक्रम, गवळी समाज, आदिवासी समाज, तसेच ओबीसी समाजासाठी सातत्याने कार्य करून कलोती परिवाराने चिखलदर्यात एक विशेष स्थान निर्माण केले आहे. हीच सामाजिक बांधिलकी पुढे नेत चिखलदर्याचा सर्वांगीण विकास हा आपला मुख्य अजेंडा असल्याचे आल्हाद कलोती यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर बोलताना स्पष्ट केले. विशेष म्हणजे आल्हाद कलोती यांची दुसरी ओळख म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे मामेभाऊ सुद्धा आहे. या उमेदवारी संदर्भात बोलताना आ. रवि राणा म्हणाले,मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे आवडीचे आणि आपुलकीचे हिल स्टेशन म्हणजे चिखलदरा. पर्यटनाच्या दृष्टीने चिखलदरा देशपातळीवर उभे राहू शकते. आल्हाद कलोती निवडून आल्यास चिखलदर्याच्या विकासाचे चित्र पूर्णपणे बदलणार आहे. स्काय वॉक, पर्यटनविकास, रस्ते-सुविधा, पिण्याच्या पाण्याचे प्रकल्प व विद्युत प्रकल्प, पायाभूत सोयी अशा मोठ्या प्रकल्पांना गती मिळेल. चिखलदर्याच्या सर्वांगीण विकासासाठी आल्हाद कलोती यांचे निवडुन येणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच युवा स्वाभिमान पार्टीचा संपुर्ण पाठिंबा आल्हाद कलोती यांच्या उमेदवारीला असल्याचे सुद्धा स्पष्ट केले. आल्हाद कलोती यांच्या उमेदवारीने चिखलदर्याच्या राजकारणात नवीन जागृती निर्माण झाली असून, विकासाभिमुख नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात असल्याचे वातावरण चिखलदर्यात पाहायला मिळत आहे. विविध समाजघटकांचा वाढता पाठिंबा, चिखलदर्याच्या पर्यटन क्षमतेबद्दलची त्यांची स्पष्ट दृष्टिकोन आणि कलोती परिवाराची सामाजिक परंपरा या आधारावर त्यांची उमेदवारी जोरदार चर्चेत आहे. निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसतसे चिखलदर्यात आल्हाद कलोती यांच्या प्रवेशामुळे विकासाचे नवीन समीकरण तयार होत असल्याचे जाणकारांचे मत आहे. आल्हाद कलोत यांच्या उमेदवारी दाखल करतेवेळी अमरावती जिल्हा निवडणुक प्रभारी आ.संजय कुटे, राज्यसभा खासदार डॉ.अनिल बोंडे, मा.खा.नवनित राणा, आ.केवलराम काळे, प्रभुदास भिलावेकर, प्रविण पोटे, राजेंद्र सोमवंशी, राजेश मांगलेकर, अन्वर हुसेन, वेदांत सुरपाटणे, गुरु ठाकुर सोमवंशी, जितु पचोरी, तिलक मिश्रा, सुरज तिवारी, पंकज पचोरी, अनुप सोमवंशी, अरुण तायडे, शेख भिक्कम भाई, अमोल हाते, प्रमोद शनवारे, राम हेगडे, रामेश्वर निखाडे, आदि उपस्थित होते.




