निवडणुकीच्या तोंडावर जिल्ह्यातील 500 सेतू केंद्र बंद

केंद्र चालकांचा तीन दिवसांचा संप

* प्रमाणपत्रांसाठी नागरिकांची धावपळ

* दररोज लाखोंचा महसूल तोटा

अमरावती/ 12 नोव्हेंबर -नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीची प्रक्रिया सुरू असताना जिल्यातील सुमारे 500 सेतू केंद्र आजपासून बंद आहेत. महा ई-सेवा आणि आधार केंद्र संघटनेने विविध मागण्यांसाठी तीन दिवसांचा संप पुकारला आहे. संघटनेचे सचिव विनोद तायडे यांनी सांगितले की, शासनाकडून दुर्लक्ष झाल्याने हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे दररोज 4 ते 5 लाख रुपयांच्या महसुलाचे नुकसान होत आहे. राज्यभरातील हजारो केंद्र चालक या आंदोलनात सहभागी आहेत. केंद्र चालकांची मुख्य मागणी म्हणजे नवी सेतू केंद्रे सुरू न करण्याची आहे. त्यांचे म्हणणे आहे की, सध्या असलेल्या केंद्रांना पुरेसा आर्थिक फायदा होत नाही, आणि नवीन केंद्रे उघडल्यास काम कमी होईल. संघटनेने हा संप आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच जाहीर केला होता. शासनाला याबाबत कळवले गेले होते, परंतु प्रतिसाद न मिळाल्याने तीन दिवसांचा संप सुरू करण्यात आला आहे. केंद्र चालकांचे म्हणणे आहे की, शासनाने आमच्या मागण्या मान्य केल्याशिवाय सेवा सुरू होणार नाहीत.

संबंधित बातम्या

Back to top button