दर्यापुर-अंजनगाव सुर्जी नगरपरिषदांवर युवा स्वाभिमानचा झेंडा फडकविण्याचा निर्धार!

उमेदवारांच्या मुलाखतीत कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

अमरावती /9 नोव्हेंबर – युवा विचार – स्थानिक नेतृत्व – विकासाची वाट या ब्रीदवाक्यासह युवा स्वाभिमान पक्षाने दर्यापुर आणि अंजनगाव सुर्जी नगरपरिषद निवडणुकांचा बिगुल वाजवला आहे. आगामी निवडणुका ताकद, नियोजन आणि एकजुटीने लढवण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी केला आहे. दर्यापुर आणि अंजनगाव सुर्जी येथे पक्षाच्या निर्णय समितीच्या बैठका उत्साहात पार पडल्या.
नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदांसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. प्रत्येक प्रभागातून मोठ्या संख्येने उमेदवार उपस्थित राहिले. त्यांनी आपल्या भागाचा विकास आराखडा आणि लोकांशी जोडलेली कामाची भूमिका समितीसमोर मांडली. बैठकीला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नीलकंठराव कात्रे, वरिष्ठ मार्गदर्शक सुनील राणा, हरीश चरपे, शैलेंद्र कस्तुरे, अ‍ॅड. नंदेश अंबाडकर, निलेश कुलकर्णी, राजू चुनकीकर, जिलाध्यक्ष अजय देशमुख आणि महिला जिलाध्यक्ष सोनाली नवले उपस्थित होते. या सर्व मान्यवरांनी संघटन बळकट करणे, प्रचाराची दिशा ठरवणे आणि मतदारांशी थेट संवाद वाढवणे या मुद्द्यांवर मार्गदर्शन केले. राष्ट्रीय अध्यक्ष नीलकंठराव कात्रे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, युवा स्वाभिमान पक्ष हा जनतेच्या प्रश्नांवर काम करणारा पक्ष आहे. आमचं ध्येय म्हणजे गावागावात स्थानिक नेतृत्व उभं करणं आणि विकासाचा नवा मार्ग दाखवणं. बैठकीचं नियोजन अविनाश काळे यांनी केले. दर्यापुर येथील कार्यक्रमाला राष्ट्रीय सल्लागार हरीश चरपे, जिलाध्यक्ष अजय देशमुख, विठ्ठल ढोले, अमोल कावरे, अमोल दाभाडे, राहुल रांगोळे, निलेश देशमुख, तहसील अध्यक्ष अमोल कोरडे, शहराध्यक्ष किरण श्रीराव यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. महिला पदाधिकार्‍यांमध्ये शोभा ठाकरे, वर्षा बायसकर, संगीता येकीरे, मंगला ढोरे, मनिषा गजभिये, मेघा माहुरे, राणी गावंडे, दुर्गा ठाकूर, पूजा बारब्दे, प्रतिभा जाधव, सुवर्णा सराटे, राजश्री नवले, राजश्री बामणीकर यांचा समावेश होता. पुरुष कार्यकर्त्यांमध्ये सागर शेलके, शुभम रायबोले, रोहित धूराटे, ओम राणे, संदीप धंदे, आदित्य अंबुलकर, संकेत पवार, धीरज धुनारे, अभय मानकर, सुमित इंगळे, विकास खंडारे आणि अनेक तरुण कार्यकर्त्यांची उपस्थिती लक्षणीय होती. या सर्व तरुणांनी एकमुखाने निर्धार व्यक्त केला – दर्यापुर आणि अंजनगाव सुर्जी नगरपरिषदांवर युवा स्वाभिमानचा झेंडा फडकविल्याशिवाय आम्ही थांबणार नाही! बैठकीत कार्यकर्त्यांनी एकजुटीचा आणि विकासाचा संदेश दिला. सभागृह घोषणांनी दुमदुमले – जय स्वाभिमान! जय विकास! कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि ऊर्जावान वातावरणात पार पडला. युवा स्वाभिमान पक्षाने या बैठकीतून स्पष्ट संदेश दिला आहे की, ही निवडणूक फक्त नगरपरिषदेपुरती नाही, तर स्थानिक नेतृत्व उभं करण्याची आणि जनतेच्या प्रश्नांवर थेट काम करण्याची सुरुवात आहे. दर्यापुर आणि अंजनगाव सुर्जीमध्ये युवाशक्ती आता बदलासाठी सज्ज झाली आहे.

संबंधित बातम्या

Back to top button