धनंजय मुंडेंनी माझ्या हत्येचा कट रचला

मनोज जरांगेंच्या गंभीर आरोपाने खळबळ

* पत्रकार परिषदेत व्हिडीओ क्लिप दाखवली

जालना /7 नोव्हेंबर : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचण्यात आला होता, अशी माहिती गुरुवारी (ता. 6 नोव्हेंबर) समोर आली आणि संपूर्ण राज्यात खळबळ उडाली. या हत्येच्या कटासाठी अडीच कोटी रुपयांची सुपारी दिली गेल्याची माहिती सुद्धा समोर आली.
ज्यानंतर या प्रकरणी बीड पोलिसांनी तत्काळ तपास करून दोघांना ताब्यात घेतले. पण आता याच प्रकरणावरून मनोज जरांगे पाटील यांनी खळबळजनक आरोप केला आहे. त्यांनी त्यांच्या हत्येच्या सुपारीसाठी माजी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नेते धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केले आहेत. माझ्या हत्येची सुपारी धनंजय मुंडे यांनी दिली असा थेट आरोपच जरांगेंकडून करण्यात आला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येच्या कटाची बातमी वार्‍यासारखी संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचली. ज्यानंतर याबाबत धक्कादायक खुलासे करण्यासाठी आज शुक्रवारी (ता. 7 नोव्हेंबर) पत्रकार परिषद घेतली. यावेळी जरांगे म्हणाले की, कालच्या घडलेल्या प्रकाराबद्दल मला खरा मेसेज देणे गरजेचे होते. मी कालच मराठा समाजाला आवाहन केला आहे की, आपण शांत राहायचे आहे. मी आजही मराठा समाजाला हात जोडून आवाहन करतो की, तुम्ही शांत राहा, तुम्ही शांततेने घ्या. तुम्ही साधे साधे काम करा. अवघड कामे करायला मी आहे. मी आहे तोपर्यंत टेन्शन घ्यायचे नाही. मी मराठा समाजाला एक शब्द देतो की, मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तुम्हाला टेन्शन नाही. मी मेल्यानंतर तुम्हाला काय करायचे ते करा. पण मी आहे तोपर्यंत तुम्ही सर्वांनी शांत राहायचे. आपण सगळे त्यांचे डाव उघडे पाडले आहेत. मी माझ्या समाजासाठी लढणार्‍यासाठी खंबीर आहे. आपण बेसावध असतो तर ही घटना घडून गेली असती, असे जरांगेंनी सांगितले. तसेच, ज्या दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले. त्यांचे आणि धनंजय मुंडे यांच्या भेटी झाल्या आहेत. तर आपल्या हत्येचा कट उधळण्याअगोदरच 12 वाजता आरोपी आणि धनंजय मुंडे यांचे बोलणे झाले होते. बीडमध्ये आरोपी आणि धनंजय मुंडे यांच्यात बैठक झाली आणि हत्येचा कट रचण्यात आला. घातपात करण्याचा सामुहिक कट धनंजय मुंडे रचला आहे. धनंजय हे या कटाचे मुख्य सूत्रधार असल्याचा गंभीर आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला. त्यांची चौकशी करण्याची मागणी जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. इतकेच नव्हे तर छत्रपती संभाजीनगरजवळ एका ठिकाणी धनंजय मुंडे या आरोपींची वाट पाहत उभे होते. तिथे आरोपींची त्यांची भेट झाली. त्याठिकाणी मग मुंडे यांनी आपल्याला मारण्यासाठी गोळ्या देण्यास सांगितले, असा दावा सुद्धा जरांगे यांनी केला आहे. तर आपल्या वाहनाला दुसर्‍या वाहनाची धडक देण्याची योजना पण आखण्यता आली होती. मुंडे यांचे हे नपूंसक चाळे आहे. त्यांनी थेट येऊन भिडायला हवे होते, असे आव्हान देत जरांगेंनी धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. पण आता जरांगे यांनी थेट त्यांच्या हत्येच्या कटामध्ये प्रामुख्याने धनंजय मुंडे यांचे नाव घेतल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे.

 

संबंधित बातम्या

Back to top button