ठाकरेंच्या तळपायाची आग मस्तकात गेली

राज यांचा निवडणूक आयोगावर घणाघात

मुंबई/4 नोव्हेंबर – राज्य निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद पार पडली. या निवडणुकीत राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी राज्यातील 246 नगर परिषदा आणि 42 नगर पंचायतींचील निवडणूक घोषित केली. यावेळी पत्रकारांनी राज्य निवडणूक आयुक्तांना दुबार मतदार, मतदान याद्यांमधील घोळ याबाबत अनेक प्रश्न विचारले. त्यावर दिनेश वाघमारे यांनी उत्तर देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. पण महाराष्ट्रातील सर्वपक्षीय शिष्टमंडळाच्या प्रश्नांवर केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आपल्याला त्याबाबत कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही, असं उत्तर त्यांनी एका प्रश्नावर दिलं. राज ठाकरे यांनी आयुक्तांच्या पत्रकार परिषदेची एक क्लिप शेअर करत टीका केली आहे. आजच्या निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेची क्लिप मला कोणीतरी पाठवली. ती पाहून तळपायाची आग मस्तकात गेली! आणि आता 100% खात्री पटली की निवडणूक आयोग स्वायत्त आहे हे फक्त संविधानात आहे. हे सत्ताधार्‍यांच्या हातचं बाहुलं आहे. दुबार मतदार नोंदणीपासून, ते मतदार यादीतील अनेक घोळ या सगळ्यावर एकही प्रश्न विचारल्यावर जर निवडणूक आयोगाला एकही उत्तर देता येत नसेल किंवा द्यायची इच्छा नसेल तर तुमचा उपयोग काय? जबाबदारी तर तुम्ही केंव्हाच झटकली आहेत, आत्ता उत्तरदायित्व पण नाकारणार, मग तुमच्या पदांच करायचं काय?, असे सवाल राज ठाकरे यांनी केले आहेत.

संबंधित बातम्या

Back to top button