गॅस सिलिंडर 195 रुपयांनी महागला

नवी दिल्ली/1 एप्रिल- पश्चिम आशियातील वाढत्या संघर्षाचे पडसाद भारतात उमटत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी व्यावसायिक वापराच्या एलपीजी सिलिंडरच्या दरात 195.50 रुपयांची मोठी वाढ केली आहे. मात्र, घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरचे दर स्थिर ठेवल्याने सर्वसामान्यांना तूर्तास दिलासा मिळाला आहे. तेल कंपन्यांनी जाहीर केलेल्या नवीन दरवाढीनुसार, दिल्लीत 19 किलोच्या व्यावसायिक सिलिंडरची किंमत आता 2,078.50 रुपयांवर पोहोचली आहे.यापूर्वी 1 मार्च रोजी या सिलिंडरच्या दरात 114.5 रुपयांची वाढ करण्यात आली होती. एका महिन्यात दुस-यांदा झालेली ही मोठी दरवाढ हॉटेल, उपाहारगृहे आणि केटरिंग व्यावसायिकांचे बजेट कोलमडवणारी ठरणार आहे.व्यावसायिक सिलिंडरचे दर कडाडले असले, तरी घरगुती वापराच्या (14.2 किलो) सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. 7 मार्च रोजी घरगुती सिलिंडरच्या दरात 60 रुपयांची वाढ झाली होती.

संबंधित बातम्या

Back to top button