श्री क्षेत्र जहागीरपुरात हनुमान भक्तांची गर्दी

कुर्हा/2 एप्रिल : हनुमान जयंतीच्या निमित्ताने राज्यभरातील हनुमान भक्तांची रीघ श्री क्षेत्र जहागीरपूर येथे लागली होती. 2 एप्रिलला हनुमान जयंती उत्सव जिल्हाभरात साजरा करण्यात आला. जहागीरपुरात राज्याच्या कानाकोपर्यातून आलेल्या भाविक भक्तांनी पहाटे 3 ते 4 वाजता पासूनच दर्शनासाठी गर्दी केली होती.
विदर्भातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्री क्षेत्र जहागीरपूर येथील हनुमान मंदिराला आध्यात्मिकदृष्ट्या अन्यनसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे संस्थानकडून हनुमान मूर्तीच्या गाभार्याला आकर्षक फुलांनी व फुग्यांनी तसे रोषणाईने सजविण्यात आले होते. तसेच अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मंदिर प्रशासनाकडून भाविक भक्तांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करण्यात आल्या होत्या. अमरावती व कुन्हा आणि अन्य ठिकाणांहून भाविकांसाठी मोफत बससेवा देण्यात आली. या सेवाभावी उपक्रमाचा लाभभाविकांनी मोठ्या प्रमाणात घेतला. दरवर्षी हनुमान जयंतीला श्री क्षेत्र जहागीरपूर येथे हजारो भाविक दाखल होत असतात. त्यामुळे मंदिर परिसरात व्यवसायिकांनी खाण्यापिण्याच्या दुकानासह खेळण्याची दुकाने स्वरूप प्राप्त झाले होते. थाटली होती. संपूर्ण गावाला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. हनुमान जयंतीला येणार्या सर्व भाविक भक्तांसाठी भव्य दिव्य महाप्रसादाचे आयोजन भक्त निवास येथे करण्यात आले होते. या महाप्रसादाचा लाभ हजारो भाविकांनी घेतला. कुर्हा येथील जय माऊली बस सर्व्हिस तर्फे दिंगाबर दमाये, सुभाष दमाये आणि अन्य ठिकाणांहून भाविकांसाठी मोफत बससेवा देण्यात आली. या सेवाभावी उपक्रमांचा लाभ भाविकांनी मोठ्या प्रमाणात घेतला.




