राजदने बंदुकीच्या धाकावर सीएम पद मिळवले

पटना/2 नोव्हेंबर -बिहार विधानसभा निवड णुकीचा प्रचार शिगेला पोहो चला आहे. भारतीय जनता पार्टी, संयुक्त जनता दल व एनडी एतील त्यांचे मित्रपक्ष, काँग्रेस, राष्ट्रीय जनता दल व त्यांच्या महागठबंधनमधील मित्रपक्षांनी जोरदार प्रचार सुरू केला आहे. नितीश कुमार, तेजस्वी यादव, प्रशांत किशोर हे बिहारच्या वेगवेगळ्या भागांमध्ये फिरत आहेत, प्रचार करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील प्रचारात मागे राहिलेले नाहीत. ते देखील बिहारमध्ये भाजपासह एनडीए उमेदवारांचा प्रचार करत आहेत. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (2 नोव्हेंबर) बिहारमधील भोजपूर जिल्ह्यातील आरा शहरात प्रचारसभेला संबोधित केलं. यावेळी त्यांनी काँग्रेस व राजदप्रणित महागठबंधनवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी मोदी म्हणाले, काँग्रेस व राजदमध्ये सारंकाही आलबेल नाही. त्यांच्यात घमासान युद्ध चालू आहे. केवळ एकमेकांची डोकी फोडायची बाकी आहेत. निवडणुकीनंतर हे लोक एकमेकांना खायला उठतील. त्यामुळे अशा लोकांपासून दूर राहा. हे लोक बिहारचा विकास करू शकत नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, आपली राष्ट्रीय लोकशाही (एनडीए) आघाडी आज विकसित बिहारच्या संकल्पासह संपूर्ण एकजुटीने पुढे जात आहे आणि दुसर्‍या बाजूला काँग्रेस व राष्ट्रीय जनता दलामध्ये (राजद) घमासान युद्ध चालू आहे. मी तुम्हा सर्वांना एक आतली गोष्टी सांगतोय. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या एक दिवस आधी बिहारमध्ये बंद दाराआड गुंडगिरीचा खेळ खेळण्यात आला. काँग्रेसच्या कानपट्टीवर बंदूक ठेवून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करायला सांगितलं’ काँग्रेस व राजदमध्ये नुकतीच चर्चा झाली. खरंतर मुख्यमंत्रिपदासाठी राजदच्या नेत्याच्या नावावर शिक्कामोर्तब व्हावं अशी काँग्रेसची कधीच इच्छा नव्हती. परंतु, राजदनेही संधी सोडली नाही. राजदने काँग्रेसच्या कानपट्टीवर बंदूक ठेवून मुख्यमंत्रिपदाची चोरी केली. त्यांनी काँग्रेसलाच घोषणा करायला लावली. जबरदस्तीने मुख्यमंत्रिपदासाठी राजदच्या उमेदवाराला समर्थन देत असल्याची घोषणा करायला लावली. कानपट्टीवर बंदूक ठेवून वदवून घेतलं.

संबंधित बातम्या

Back to top button