तेजस्वी यादव महाआघाडीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा

राजद, काँग्रेस महाआघाडीकडून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पदाचे उमेदवार जाहीर

* मुकेश साहनी उपमुख्यमंत्रीपदाचे उमेदवार
* अशोक गहलोत यांची पत्रकार परिषदेतून घोषणा

पटणा /23 ऑक्टोबर : बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी महाआघाडीच्या नेत्यांची पत्रकार परिषद झाली. या परिषदेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक गेहलोत यांनी आगामी निवडणुकांसाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाच्या उमेदवारांची घोषणा केली. त्यानुसार, राजदचे नेते तेजस्वी यादव मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असतील आणि विकासशील इंसान पार्टी (वीआयपी) चे प्रमुख मुकेश सहनी उपमुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असतील, असे गेहलोत यांनी सांगितले. या घोषणेनंतर राजकीय वर्तुळात काँग्रेसला काय मिळणार याबाबत चर्चा रंगली. महत्त्वाची बाब म्हणजे, या पत्रकार परिषदेत काँग्रेसला मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्रीपदासाठी उमेदवार म्हणून बाजूला ठेवण्यात आले आहे. मात्र, बिहारमध्ये महाआघाडीचे सरकार आले तर एनडीएप्रमाणे दोन उपमुख्यमंत्री होण्याची शक्यता असू शकते; त्यामुळे काँग्रेसला उपमुख्यमंत्रिपद किंवा विधानसभा अध्यक्षपद मिळू शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

गेहलोत यांनी पुढे सांगितले की, राहुल गांधींसह त्यांचा निर्णय तेजस्वी यादव यांचेच मुख्यमंत्रीपदासाठी निश्चित झाले होते, कारण 2020 च्या निवडणुकीत देखील त्यांनी दमदार कामगिरी केली होती. पत्रकार परिषदेत मुख्यमंत्रीपदासाठी नाव जाहीर झाल्यानंतर तेजस्वी यादव म्हणाले की, “जेवढी प्रतीक्षा आपल्या सर्वांनी होती, तितकीच प्रतीक्षा मलाही होती,” तसेच त्यांनी महाआघाडीतील सर्व पक्षांचे आभार मानले. तेजस्वी यादवांनी राज्यातील डबल इंजिनवालं एनडीए सरकार भ्रष्टाचार आणि गुन्हेगारीमध्ये अडकले असल्याचे म्हटले आणि नवयुवकांसह नवा बिहार घडवायचा असल्याचे सांगितले. परंतु, मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असेल हे बिहारची जनता ठरवते, नेता मंडळी थोडेच ठरवतात, असे तेजप्रताप यादव, तेजस्वी यादव यांच्या भावाने विधान केल्याने बिहारच्या राजकारणात जोरदार चर्चा रंगली आहे.

संबंधित बातम्या

Back to top button