15 ऑक्टोबरपासून विदर्भ, मराठवाड्यात वादळी पावसाची शक्यता

हवामान विभागाचा अंदाज

नागपूर / 13 ऑक्टोंबर : नवरात्र आणि दसऱ्याच्या काळात पावसाने गरबा खेळणाऱ्यांच्या उत्साहात बाधा आणली आणि आयो-जकांची तारांबळ उडविली. आता दिवाळीच्या तोंडावर पावसाचा अंदाज वर्तविला जात आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील हवामान पूर्णपणे कोरडे आहे, कारण नैऋत्य मान्सूनने राज्यातून निरोप घेतला आहे. मात्र 15 ऑक्टोबरपासून राज्यातील हवामानात पुन्हा बदल अपेक्षित आहे.

15 ते किमान 18 ऑक्टोबरपर्यंत विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात आभाळी हवामान आणि दुपार नंतर वादळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. सध्याच्या अंदाजानुसार वादळी पावसाची सर्वात जास्त शक्यता आणि प्रमाण विदर्भ व मराठवाड्यात राहू शकते. या दरम्यान अनेक भागांमध्ये आभाळी हवामान किंवा वादळी पावसाची शक्यता राहील, तर खानदेश आणि मध्य महाराष्ट्रात विखुरलेल्या स्वरूपाचा वादळी पाऊस पडू शकतो, असे हवामान विभागाने सांगितले आहे.

शेतकर्‍यांनी हवामानाच्या या स्थितीनुसार आपले नियोजन करावे आणि काढणी केलेल्या पिकांना वादळी पाऊस आणि वार्‍यापासून सुरक्षित ठेवावे, असे कृषी विभागाकडून आवाहन करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या

Back to top button