प्रवीण पोटे पाटील यांची भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड
भाजपाची महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी जाहीर

* 12 उपाध्यक्ष, 6 सरचिटणीस आणि 12 चिटणीसासह 43 नावांची घोषणा
* विदर्भातील ताकद वाढवण्यासाठी पक्षश्रेष्ठींचा विेशास
मुंबई /24 फेब्रुवारी : भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मंगळवारी भाजपच्या नव्या प्रदेश कार्यकारिणीची अधिकृत घोषणा केली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि 2029 च्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या या कार्यकारिणीत अमरावतीचे माजी पालकमंत्री आणि माजी राज्यमंत्री प्रवीण पोटे पाटील यांच्यावर प्रदेश उपाध्यक्षपदाची अत्यंत महत्त्वाची आणि मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. विदर्भातील पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी पोटे पाटील यांच्या दांडग्या अनुभवाचा आणि जनसंपर्काचा उपयोग करून घेण्याचे धोरण पक्षाने आखले आहे. रवींद्र चव्हाण यांनी पदभार स्वीकारल्यानंतर तब्बल आठ महिन्यांच्या प्रदीर्घ विचारमंथनानंतर ही नवी टीम जाहीर केली आहे. यामध्ये 12 उपाध्यक्ष, 6 सरचिटणीस आणि 12 चिटणीस अशा एकूण 43 पदाधिकार्यांचा समावेश आहे. विशेषतः विदर्भातून प्रवीण पोटे पाटील यांच्यासह माजी खासदार रामदास तडस आणि संजय भेंडे यांनाही उपाध्यक्ष म्हणून स्थान देऊन भाजपने पूर्व आणि पश्चिम विदर्भाचा समतोल साधला आहे. अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून प्रदीर्घ काळ काम केलेल्या पोटे पाटलांकडे आता संपूर्ण राज्यातील संघटनात्मक कार्याची सूत्रे असतील.
या नव्या रचनेत आमदार गोपीचंद पडळकर, माजी खासदार सुजय विखे पाटील, भारती पवार, अतुल काळसेकर, संजय कौडगे, केशव उपाध्ये, चैतन्यबापू देशमुख, प्रिया शिंदे आणि अर्चना पाटील चाकूरकर यांचीही उपाध्यक्षपदी वर्णी लागली आहे. मुख्य प्रवक्ते म्हणून केशव उपाध्ये यांच्या जागी आता नवनाथ बन हे कामकाज पाहतील. युवा आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदी कोल्हापूरचे कृष्णराज महाडिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे, तर महिला मोर्चाची धुरा पुन्हा एकदा चित्रा वाघ यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. सरचिटणीस पदावर निरंजन डावखरे, योगेश सागर, संजय कुटे, माधवी नाईक, राजेश पांडे आणि सुनील राणे यांची निवड झाली आहे. चिटणीस म्हणून प्रशांत ठाकूर, मंगेश चव्हाण, परिणय फुके, वर्षा ढहाळे, संतोष जनाटे, संजय जगताप, अर्चना डेहनकर, रोहिणी नायडू, राम सातपुते, प्रवीण घुगे, रेखा कुलकर्णी आणि भैरवी वाघ जबाबदारी सांभाळतील. विविध आघाड्यांच्या अध्यक्षपदी योगेश टिळेकर (इतर मागास वर्ग), रामकृष्ण वेताळ
विदर्भाचे नेतृत्व आणि पोटे पाटलांचे वजन
अमरावती जिल्ह्यासह संपूर्ण विदर्भात भारतीय जनता पक्षाचा जनाधार वाढवण्यासाठी प्रवीण पोटे पाटील यांचा मोठा वाटा राहिला आहे. त्यांच्याकडे असलेल्या माजी राज्यमंत्री आणि पालकमंत्री पदाच्या अनुभवामुळे आगामी निवडणुकीत पश्चिम विदर्भातील जागा जिंकण्यासाठी भाजपला त्यांची मोठी मदत होणार आहे.




