एस.एफ.आय.चे 19 वे महाराष्ट्र राज्य अधिवेशन अमरावती जिल्ह्यात नांदगांव खंडेश्वर येथे

अधिवेशनाचे उदघाटक व्ही पी सानू, अखिल अध्यक्ष भारतीय एस.एफ.आय.

अधिवेशनाचे स्वागत अध्यक्ष प्रा डॉ प्रशांत विघे, सीनेट सदस्य सं गाबावि अमरावती व राज्यशास्त्र विभाग प्रमुख भारतीय महाविद्यालय अमरावती
नांदगाव खंडेश्वर/30 मे : आपल्या अमरावती जिल्हयातिल शिक्षणमहर्षी; देशाचे पहिले कृषि मंत्री;बहुजना साठी शिक्षणाचे दार उघड़न्या साठी श्री शिवाजी शिक्षण संस्था स्थापना करनारें आदरणीय भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांच्या जन्मगावाच्या तालुक्यात देशातील सर्वात मोठी व सर्वात लढाऊ विद्यार्थी संघटना स्टुडेंट्स फेडरेशन ऑफ इंडिया ( एस एफ आय) चे 19 वे महाराष्ट्र राज्य अधिवेशन दि 2-3-4 जून 2025 रोजी राष्ट्रसंत तुकड़ोजी महाराज नगरी, योगिनी मंगल कार्यालय, शिवाजी हायस्कूल मागे, पहुर रोड नांदगांव खंडे येथे आयोजित केले आहे.या राज्य अधिवेशन यशस्वी करन्यासाठी स्वागताध्यक्ष प्रा डॉ प्रशांत विघे सीनेट सदस्य संत गाडगे बाबा विद्यापीठ यांच्या अध्यक्षतेखाली स्वागत समिति स्थापन करण्यात आली आहे. अधिवेशनाचे उदघाटन स्टूडेंट्स फेडरेशन ऑफ इंडिया एस एफ आय चे अखिल भारतीय अध्यक्ष व्ही पी सानू, केरल हे करणार आहेत .प्रमुख अतिथि अखिल भारतीय सचिव; मयूख बिस्वास पश्चिम बंगाल, डॉक्टर अजित नवले, राज्य सरचिटनिस; अहिल्या नगर, आमदार विनोद निकोले; डहानू विधान सभा तसेच स्वागत कमिटी सदस्य राहतील.
एस एफ आय ही शहीद भगतसिंह शहीद राजगुरु, शहीद सुखदेव, शहीद चंद्रशेखर आज़ाद, शहीद बिरसा मुंडा या क्रान्तिकारकाना आपला आदर्श मानून छत्रपति शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले; क्रांतिज्योति सावित्री बाई फूले, छत्रपति राजश्री शाहू महाराज; डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, संत गाडगे बाबा, राष्ट्रसंत तुकड़ोजी महाराज, शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचा वैचारिक, शैक्षणिक, सामाजिक कार्याचा वारसा एस एफ आय आपल्या लड़याच्या माध्यमातुन पुढ़े घेवून जाण्याचे कार्य करीत आहे.
स्टूडेंट्स फेडरेशन ऑफ इंडिया एस एफ आय ही विद्यार्थी वर्गाचे प्रश्न सोडविन्यात देशात; राज्यात; अमरावती जिल्ह्यात सुद्धा आजवर अग्रेसर राहत आली आहे. अभ्यास व संघर्ष हे ब्रीद घेवून सर्वांना शिक्षण -सर्वांना काम ही मूलभुत मागनी घेवून सर्वांना मोफ़त शिक्षण;समान सकतीचे;दर्जेदार वैज्ञानिक दृष्टिकोण देनारे आणि रोज़गारभीमुख शिक्षण मिळावे या साठी देशभर सतत संघर्ष करून लढ़ा देत आहे.
अमरावती जिल्ह्यातही 1982 पासुन एस एफ आय ही संघटना विद्यार्थी वर्गाच्या शैक्षणिक प्रश्नावर कार्यरत आहे ; 90 च्या दशकात विद्यापीठ परिसर ;शासकीय मेडिकल कॉलेज; खाज़गी मेडिकल; इंजीनियरिंग;बीएड; डीएड विरोधात मोठी आंदोलने; आय टी आय मध्ये मराठी तुन प्रश्नपत्रिका स्टाइपेंड तालुक्यात आय टी आय; या प्रश्नावर एस एफ आय ने आंदोलने उभारली होती; आजही विद्यार्थी वर्गाचे शिष्यवृत्ति; वस्तीगृह प्रवेश; करियर मार्गदर्शन; मूलीच्या प्रश्न साठी सम्मेलन; करियर मार्गदर्शन; शैक्षणिक परिसंवाद; सामाजिक उपक्रम राबवीत कार्यरत आहे.
या संघटनेचे अधिवेशन भाऊ साहेब डॉ पंजाबराव देशमुख यांच्या जन्मगावाच्या तालुक्यात व संत गाडगे बाबा व राष्ट्रसंत तुकड़ोजी महाराज यांच्या कर्मभूमि होत आहे. या अधिवेशनाच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्यातुन 300 विद्यार्थी प्रतिनिधि दि.2, 3, 4 जून 2025 तीन दिवस नांदगांव खंडे येथे येणार आहेत.या अधिवेशनाच्या उद्घाटन सत्र व ज़ाहिर सभेला बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन स्वागत समिति वतिने
प्रा डॉ प्रशांत विघे स्वागताध्यक्ष, राज्यशास्त्र विभाग प्रमुख भारतीय महाविद्यालय, प्रा बी आर वाघमारे उपाध्यक्ष, माजी परीक्षा नियंत्रक संगाबा अमरावती विद्यापीठ कॉमरेड पी बी उके उपाध्यक्ष, अध्यक्ष, स्वाभिमानी विद्युत वर्कर्स यूनियन कॉमरेड सुभाष पांडे, सचिव माकप राज्य कमिटी सदस्य, सीटू जिल्हा अध्यक्ष कॉमरेड रमेश सोनुले सचिव जिल्हा सचिव माकप, अध्यक्ष आंगनवाड़ी कर्मचारी संघटना सीटू कॉमरेड सुनिल देशमुख सहसचिव, सीटू जिल्हासचिव कॉमरेड श्याम शिंदे कोषाध्यक्ष, किसान सभा जिल्हा सचिव, स्वागत समिति सदस्य प्रा. डॉ. दिलीपजी काळे, समाजकार्य महाविद्यालय माजी प्राचार्य, शरदजी चवाळे, प्रा. सचिन तंबाखे, प्रा डॉ दिलीप काळे माजी प्राचार्य समाजकार्य महाविद्यालय अमरावती, श्री पंकज दादा वैद्य, स्तंभ लेखक व सामाजिक कार्यकर्ता, एडवोकेट धनंजय तोटे, मिलिंद अंबरते, माजी व्यवस्थापक अभिनंदन बैंक, प्रा नितिन टाले; सीनेट सदस्य; मिराज खान पठान अध्यक्ष विदर्भ उर्दू साहित्य परिषद, इमरान अशर्फी सामाजिक कार्यकर्ता, अक्षय पारसकर माजीं नगराध्यक्ष प्रकाश मारोटकर सामाजिक कार्यकर्ते सचिनभाऊ रिठे, सामाजिक कार्यकर्ते, मो. साजिद भाई सामाजिक कार्यकर्ते भैय्यासाहेब धवस, निलेश इखार किरण सरदार, सुरेशराव ढवळे, पत्रकार डॉ संजय जेवडे, पत्रकार संजय पोपळे, पत्रकार, उत्तम ब्राह्मणवाडे पत्रकार, मनोज मानतकर, पत्रकार, अथर खान, पत्रकार, उमेश चौकडे, पत्रकार, सागर सव्वालाखे, पत्रकार, घोरपडे मुख्याध्यापक, डॉ. मंगेश पचंगाडे, डॉ. शुभम वासुदेव लोखंडे, विलास मारोटकर मुख्याध्यापक, नारायण सोनोने, मुख्याध्यापक कॉ महादेव गारपवार, अ.भा.किसान सभा जिल्हा अध्यक्ष, कॉ देवीदास राउत कार्याध्यक्ष किसान सभा; कॉ पद्माताई गजभिए अध्यक्ष जनवादी महिला संघटना, आशा ताई वैद्य, जिल्हा सचिव जनवादी महिला संघटना, कॉ राजेंद्र भांबोरे सीटू कोषाध्यक्ष, अंकुश वाघ, जिल्हा सहसचिव सीटू, कॉ दिलीप शापामोहन अध्यक्ष शेतमजूर यूनियन; ज्ञानेश्वर शिंदे, किशोर शिंदे सीटू सहसचिव रामदास मते, दिलीप महल्ले, अनिल मारोटकर, अशोक केसरखाने, मोहसीन शेख, राजेंद्र राऊत, दीपक अंबाडरे, रुस्तमखा पठाण सह सर्व स्वागत कमिटी सदस्य करीत आहे.

संबंधित बातम्या

Back to top button