अतिवृष्टीग्रस्तांसाठी 31 हजार 628 कोटींचे पॅकेज

253 तालुक्यांना सरसकट मदत देणार

*‘खरडून गेलेल्या जमिनीला’ हेक्टरी 3.47 लाखांची मदत
* शेतकरी, घरे आणि जनावरांसाठी भरीव निधी

* राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय

मुंबई /7 ऑक्टोबर : महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतीपिकांसह घरे आणि जमीन यांचेही मोठे नुकसान झाल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत तब्बल 31,628 कोटी रुपयांचे मदत पॅकेज जाहीर केले. गेल्या अनेक दिवसांपासून अतिवृष्टीग्रस्त शेतकरी या पॅकेजच्या प्रतीक्षेत होते. विशेषतः मुख्यमंत्र्यांनी दिवाळीपूर्वी मदतनिधी थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल, असे आश्वासन दिल्यामुळे आजच्या मंत्रिमंडळ बैठकीकडे राज्याचे लक्ष लागले होते. दिवाळी सणाला काही दिवसच उरले असताना राज्य सरकारने हे मोठे मदत पॅकेज जाहीर केले आहे. पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी माहिती दिली की, राज्यात अतिवृष्टीमुळे 68 लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून, 29 जिल्ह्यांमध्ये मोठे नुकसान झाले आहे आणि 2,059 पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर, मंत्रिमंडळ बैठकीत 253 तालुक्यांना सरसकट मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

* खरडून गेलेल्या जमिनीसाठी मोठी भरपाई

या पॅकेजमधील सर्वात मोठी घोषणा जमीन वाहून गेलेल्या शेतकऱ्यांसाठी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, ज्या शेतकऱ्यांची जमीन अतिवृष्टीच्या पाण्यात वाहून गेली किंवा खरडून गेली आहे, त्यांना हेक्टरीसाठी 47,000 रुपयांची रोख नुकसान भरपाई आणि हेक्टरीसाठी 3 लाख रुपयांची मदत नरेगाच्या माध्यमातून दिली जाईल. यामुळे जमीन खरडून गेलेल्या शेतकऱ्यांना मिळणारी एकूण मदत जवळपास हेक्टरी 3.47 लाख रुपये इतकी होणार आहे.

संबंधित बातम्या

Back to top button