474 राजकीय पक्षांची नोंदणी रद्द

आर्थिक लेखाजोखा न सादर केल्यामुळे कारवाई

* महाराष्ट्रातील 44 पक्षांचा समावेश
* निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
* आतापर्यंत 808 पक्षांची नोंदणी रद्द

मुंबई /19 सप्टेंबर – निवडणूक आयोगाने देशातील बिगर मान्यप्राप्त राजकीय पक्षांवर मोठी कारवाई केली आहे. आयोगाकडून एकूण 474 राजकीय पक्षांची नोंदणी रद्द करण्यात आली आहे. याआधी ऑगस्ट महिन्यातही मोठी कारवाई करण्यात आली होती, ज्यात एकूण 334 पक्षांची नोंदणी रद्द केली गेली होती. भारतीय प्रतिनिधी कायदा, 1951 नुसार, नोंदणीकृत राजकीय पक्ष निवडणुकीत सहभाग न घेतल्यास सलग 6 वर्षे, त्याची नोंदणी रद्द होऊ शकते. या नियमांनुसार निवडणूक आयोगाने कारवाई केली असून आतापर्यंत एकूण 808 पक्षांची नोंदणी रद्द करण्यात आली आहे. नोंदणीकृत राजकीय पक्षाला करात दाखल करण्याची सवलत मिळते, परंतु 6 वर्षे निवडणुकीत सहभाग न घेतलेल्या पक्षांवर कारवाई होते.

2019 पासून आयोगाकडून नोंदणीकृत नसलेल्या राजकीय पक्षांवर कारवाई सुरू करण्यात आली आहे. या वर्षी 9 ऑगस्ट रोजी पहिली कारवाई करण्यात आली, त्यानंतर 18 सप्टेंबर रोजी दुसरी कारवाई झाली. मागील दहा महिन्यांत 808 राजकीय पक्षांची नोंदणी रद्द करण्यात आली आहे. सध्या अजून 359 राजकीय पक्ष आयोगाच्या रडारवर आहेत, ज्यातील काही मागील 6 वर्षांपासून निवडणुकीपासून लांब आहेत आणि गेल्या तीन वर्षांत त्यांची फायनान्शिअल माहितीही सादर केलेली नाही. यावर कारवाई सुरू आहे.

आयोगाकडून कारवाई करण्यात आलेले राजकीय पक्ष 23 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये आहेत. उत्तर प्रदेशात 121, बिहारमध्ये 15, हरियाणामध्ये 17, मध्य प्रदेशमध्ये 23, महाराष्ट्रात 44 आणि पंजाबमध्ये 21 राजकीय पक्षांची नोंदणी रद्द करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या

Back to top button