आदिवासी समाजावर होणार्‍या अन्यायाच्या निषेधार्थ धरणे आंदोलन

मुख्यमंत्री, आदिवासी विकासमंत्री व राज्यपालांना पाठविले निवेदन

अमरावती /19 सप्टेंबर : आदिवासी समाजावर होत असलेला अन्याय, पदभरतीध्ये विलंब यासह विविध समस्यांच्या मागणीसाठी आदिवासी विकास संघटनेकडून 19 सप्टेंबर रोजी शुक्रवारी एक दिवशीय धरणे आंदोलन करण्यात आले. मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आदिवासी विकास मंत्री अशोक उईके आणि राज्यपालांना जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्यामार्फत पाठविण्यात आले. जय वालेखान आदिवासी विकास संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी निवेदनात असाही उल्लेख केला आहे की, छत्रपती संभाजी नगरमधील मुस्लिमांना बनावट टाकणकर जात प्रमाणपत्रे देण्यात आली आहेत. या प्रकरणाची त्वरित चौकशी करण्यासाठी एसआयटी समिती नियुक्त करावी आणि संबंधित अधिकार्‍याविरुद्ध फौजदारी खटला दाखल करावा. हैदराबाद राजपत्राच्या आधारे बंजारा आणि धनगर जातींना घटनात्मक आदिवासी आरक्षण कोणत्याही परिस्थितीत देऊ नये, आदिवासी समाजाला 2011 सालच्या लघु संवर्गाची मुद्दा यादी कायम ठेवून मूलभूत हक्कांच्या मुद्दा क्रमांक 8 ऐवजी मुद्दा क्रमांक 3 वर पुनर्स्थापित करावे, 12 हजार 500 आदिवासी विशेष पदांसाठी भरती त्वरित जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील पालोदी सरकारी आदिवासी आश्रम शाळेत झालेल्या आदिवासी विद्यार्थिनीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी आणि दोषींना पॉक्सो कायद्याअंतर्गत शिक्षा करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या

Back to top button