सर्व दाखले रद्द करणे अन्यायकारक : संजय खोडके

पोलिसांनी दबावाखाली काम करू नये

-जन्मदाखला प्रकरणावर राजकीय खडाजंगी
-किरिट सोमय्या आणि खोडके आमनेसामने
अमरावती / 10 सप्टेंबर : शहरातील जन्म-दाखला प्रकरण पुन्हा तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे आमदार संजय खोडके म्हणाले की, केवळ तांत्रिक चुका किंवा प्रशासकीय त्रुटीमुळे सर्व दाखले रद्द करणे चुकीचे आणि अन्यायकारक आहे. त्याचबरोबर त्यांनी पोलिसांनी कुणाच्याही दबावाखाली येऊन कारवाई करू नये, ही सूचना दिली. संजय खोडके यांनी स्पष्ट केले की, या प्रकरणातील प्रत्येक दाखल्याची काटेकोर पडताळणी होणे आवश्यक आहे आणि लोकांना विनाकारण त्रास होऊ नये.
संजय खोडके यांनी सांगितले की प्रशासनाने ऑगस्ट 2023 ते डिसेंबर 2024 या कालावधीत काढलेल्या तब्बल 2800 जन्म-मृत्यू दाखले रद्द करण्याची प्रक्रिया योग्य प्रकारे होणे ेआवश्यक आहे. ज्या व्यक्तींनी कागदपत्रांमध्ये खोडतोड करून दाखले मिळवले, त्यांचे दाखले रद्द करणे योग्य आहे; मात्र, फक्त तांत्रिक चुका झाल्यामुळे सर्व दाखले रद्द करणे चुकीचे आहे. त्यांनी पोलिसांना स्पष्ट सूचना दिली की, कोणत्याही राजकीय दबावाखाली येऊ नका आणि सर्व प्रकरणे निष्पक्ष तपासली जावीत. संजय खोडके पुढे म्हणाले की, ते प्रशासनातील वरिष्ठ अधिकार्‍यांची भेट घेऊन प्रकरणाची सखोल माहिती घेणार आहेत आणि कुणावरही अन्याय होऊ नये.
भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी या प्रकरणात गंभीर आरोप केले की, शहर आणि जिल्ह्यातील काही बांगलादेशी व रोहिंग्यांनी स्थानिक अधिकार्‍यांच्या संगनमताने उशिरा जन्म व मृत्यू दाखले मिळवले आहेत. सोमय्यांनी गाडगेनगर पोलीस ठाणे आणि पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांची भेट घेत तातडीची कारवाई करण्याची मागणी केली.
राष्ट्रवादीच्या आमदार सुलभा खोडके यांनी ठामपणे सांगितले की, एकही दाखला रद्द होऊ देणार नाही. यावर प्रतिक्रिया देताना किरीट सोमय्यांनी उपरोधिक भाषेत टोमणे मारले. त्यांनी म्हटले की आमदार खोडके यांना व्याकरण समजले नसावे किंवा आम्हालाच त्यांचे व्याकरण कळत नसावे. सोमय्यांनी पुढे स्पष्ट केले की प्रशासनाने नायब तहसीलदारांच्या स्वाक्षरीने जारी केलेले दाखलेच रद्द केले आहेत, त्यामुळे रद्द न होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. संजय खोडके यांनी सांगितले की प्रशासनाने 2800 जन्म-मृत्यू दाखले रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये ज्या दाखल्यांचा गैरवापर केला गेला आहे, त्यांचे रद्द करणे योग्य आहे, परंतु केवळ तांत्रिक चुका झाल्यामुळे सर्व दाखले रद्द करणे चुकीचे आहे. प्रत्येक दाखलाची योग्य पडताळणी होणे आवश्यक आहे, जेणेकरून लोकांना विनाकारण त्रास होणार नाही.
-प्रशासनाला सूचना
संजय खोडके म्हणाले की, पोलिसांनी कुणाच्याही दबावाखाली न येता निष्पक्ष कारवाई करावी. ते लवकरच प्रशासनातील वरिष्ठ अधिकार्‍यांची भेट घेऊन प्रकरणाची सखोल माहिती घेणार आहेत. लोकांना त्रास होऊ नये, कुणावरही अन्याय होऊ नये, ही आमची ठाम भूमिका आहे, असे ते म्हणाले.

संबंधित बातम्या

Back to top button