चांदूर रेल्वे पोलिसांनी जप्त केला 25 लाखांचा गांजा

दोघांना अटक, ओडिशाहून महाराष्ट्रात तस्करी

-आरोपींमध्ये नांदगाव खंडेश्वरचा तरुण
चांदुर रेल्वे / 22 ऑगस्ट  : चांदूर रेल्वे पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे 22 ऑगस्ट रोजी पळसखेड-नांदगाव खंडेश्वर रस्त्यावर मोठी कारवाई केली. बेकायदेशीर गांजा तस्करी करणार्‍या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत 1 क्विंटल 11 किलो 600 ग्रॅम गांजा जप्त झाला आहे, ज्याची किंमत अंदाजे 25 लाखांपेक्षा अधिक आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी एकजण नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील पिंपळगाव बैनई गावचा 21 वर्षीय यश भास्कर लाहे आहे, तर दुसरा आरोपी मुंबईत राहणारा 36 वर्षीय फिरोज सय्यद अन्वर सय्यद आहे. आरोपींकडून तस्करीसाठी वापरलेले बोलेरो वाहन, दोन मोबाईल, एक टॅब आणि रोख रक्कम मिळवून एकूण 37,42,400 रुपये किमतीचा माल जप्त करण्यात आला आहे.
चांदूर रेल्वे पोलीस स्टेशन अधिकारी अजय आकरे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अतिरिक्त पोलीस अधीक्षक पंकज कुमावत व उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अजय आक्रे, पोउपनि रोहित कुदळे, पोउपनि नंदलाल लिंगोट, शिवाजी घुगे, प्रवीण मेश्राम, राहुल इंगळे, नीलेश रिठे, प्रशांत ढोके, संदीप वासनिक, संदीप बटुकाळे, ऋषिकेश किरसे, डी.एस. बिरोले व चंद्रकांत गाडे यांनी कारवाईत सहभाग घेतला. दोन्ही आरोपींविरुद्ध एनडीपीएस कायद्याच्या कलम 8 (उ), 20 (इ) (ळळ), आणि 29 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

संबंधित बातम्या

Back to top button