सुप्रीम कोर्टाचा राज ठाकरेंच्या मनसेला दिलासा
जनहित याचिका फेटाळत याचिकाकर्त्याला फटकारलं

मुंबई /11 ऑगस्ट : मनसे प्रमुख राज ठाकरे यांना सुप्रीम कोर्टात मोठा दिलासा मिळाला आहे. राज ठाकरेंच्या मनसेची राजकीय मान्यता रद्द करण्यात यावी, अशी जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाने जनहित याचिका फेटळत राज ठाकरेंना सुप्रीम दिलासा दिला. कोर्टाने याचिकाकर्त्याला फटकरले अन् प्रसिद्धीसाठी असले धाडस करू नका, असे खडसावले. वकील घनश्याम उपाध्याय यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करून मनसे प्रमुख राज ठाकरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांविरुद्ध एफआयआर दाखल करण्याचे आदेश देण्याची मागणी केली होती. घनश्याम उपाध्याय यांनी राज ठाकरेंवर गुन्हा दाखल करावा आणि मनसेची राजकीय मान्यता रद्द करण्यात यावी, अशी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालायत दाखल केली होती. प्रमुख न्यायमूर्ती बी. आर. गवई यांच्या खंडपीठासमोर या जनहित याचिकेची सुनावणी पार पडली. यावेळी बी. आर. गवई यांनी याचिकाकर्ते घनश्याम उपाध्याय यांना झापत राज ठाकरे यांना दिलासा दिला. महाराष्ट्रात हायकोर्ट असताना सर्वोच्च न्यायालयात याचिका का केली? प्रसिद्धीसाठी आशा याचिका करण्याचे धाडस करू नका, असे सांगत गवई यांनी उपाध्याय यांना इशारा दिलाय.




