संघभावना, संघटनेत काँग्रेस कमी

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी कार्यकर्त्यांचे कान टोचले

पुणे /11 ऑगस्ट : ‘गावोगावी काँग्रेसचा चिवट कार्यकर्ता आहे. जाज्ज्वल इतिहास आणि विचार, तसेच सक्षम नेतृत्व ही काँग्रेसची जमेची बाजू आहे. मात्र, कृती, संघभावना आणि संघटनेत काँग्रेस कमी पडत आहे. मी-मी केल्याने अनेक त्रिज्या निर्माण झाल्या आहेत. ही उणीव भरून काढावी लागेल,’ असे स्पष्ट मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी येथे सोमवारी व्यक्त केले. ‘प्रदेश कार्यकारिणीच्या प्रशिक्षण कार्यशाळेच्या माध्यमातून ही कमतरता दूर होईल, असा विेशास आहे,’ असेही सपकाळ म्हणाले. काँग्रेसच्या नवनियुक्त प्रदेश पदाधिकार्‍यांच्या दोन दिवसीय कार्यशाळेला सोमवारी खडकवासला येथे सुरुवात झाली. या कार्यशाळेचे उद्घाटन सपकाळ यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. विधानसभेतील गटनेते विजय वडेट्टीवार, विधान परिषदेतील गटनेते सतेज उर्फ बंटी पाटील, काँग्रेस कार्य समितीचे सदस्य आणि माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, माजी मंत्री डॉ. विेशजित कदम, अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सचिव बी. एम. संदीप, कुणाल चौधरी, यू. बी. व्यंकटेश, उपाध्यक्ष संघटन आणि प्रशासन ड. गणेश पाटील, वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे, प्रदेश काँग्रेसचे खजिनदार ड. अभय छाजेड आणि उपाध्यक्ष मोहन जोशी या वेळी उपस्थित होते.‘एकसंघ राहणे ही काँग्रेसची कार्यपद्धती आहे. कार्यकर्ते आणि पदाधिकार्‍यांचे ते उत्तरदायित्व आहे. सध्या काँग्रेसमध्ये कोण कोणत्या गटाचा आणि कोण कोणत्या नेत्याच्या जवळचा असा प्रकार दिसत नाही. मात्र, येत्या काळात काही दक्षता घ्यावी लागेल. ‘ओरिएंटेशन’, ‘इंट्रोडक्शन’ आणि ‘इंटरक्शन’ या त्रिसूत्रीवर काम करावे लागणार आहे. निवडणुकीपुरते जागे व्हायचे आणि निवडणुकीनंतर सर्व संपले, हा काँग्रेसचा विचार नाही, हे लक्षात घ्यावे लागेल,’ असे सपकाळ यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

Back to top button