शेतकर्‍यांच्या हिताशी तडजोड नाही

ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉरला पंतप्रधान मोदींचा पलटवार

* * दिल्लीतील स्वामीनाथन शताब्दी परिषदेत संबोधन                                                                                                              नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आधीभारतावर 25 टक्के आयात शुल्क लादण्याची घोषणा केली. त्यानंतरभारत रशियाकडून तेल खरेदी करतअसल्यामुळे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी (6ऑगस्ट) भारतावर 25 टक्के अतिरिक्त आयात शुल्क लादतअसल्याची घोषणा केली.अशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीआणि केंद्र सरकारला विरोधकांनी धारेवर धरले होते. पंतप्रधान मोदीआता अमेरिकाला उत्तर देणार का?डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेल्या
निर्णयाला पंतप्रधान मोदी विरोधकरणार का? असा सवाल विरोधकांनी केला होता.अखेर गुरुवारी (7 ऑगस्ट)एमएस स्वामीनाथन शताब्दी आंतरराष्ट्रीय परिषदेत पंतप्रधान नरेंद्रमोदी यांनी अमेरिकेच्या टॅरिफचा उल्लेख न करता सांगितले की,आपल्या शेतकर्‍यांचे हित हे आमचेसर्वोच्च प्राधान्य आहे. भारत
आपल्या शेतकरी, पशुपालक आणिमच्छीमार बंधू-भगिनींच्या हिताशी कधीही तडजोड करणार नसल्याचेत्यांनी ठामपणे सांगितले आहे.तसेच, मला माहिती आहे की मलावैयक्ति करीत्या मोठी किंमत मोजावीलागेल, पण मी त्यासाठी तयार
आहे, असेही ते पुढे म्हणाले.अमेरिकेने भारतावर तब्बल 50 टक्केआयात शुल्क लादण्याची घोषणा केल्यानंतर दुसर्‍याच दिवशीपंतप्रधान मोदींचे हे विधानआल्यामुळे चर्चा होत आहे. सदरकार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदीम्हणाले की, भारत आपल्याशेतकर्‍यांचा पाठीशी खंबीरपणे उभाआहे. त्यांच्या कल्याणासाठी मीप्रत्येक आव्हानाला तोंड देण्यासाठीतयार आहे. वाढत्या आंतरराष्ट्रीय दबावाला न जुमानता मोदी यांनीग्रामीण भारताच्या, खेड्यांमधील समुदायांच्या संरक्षणाच्या जबाबदारीबाबतचा सरकारचा निर्धार मोदी यांनी यावेळी
अधोरेखित केला. दरम्यान, भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर
जयस्वाल यांनी ट्वीट करत अमेरिकेचा हा निर्णय अत्यंत दुर्दैवी, अवास्तव
आणि अन्यायकारक असल्याचे मत व्यक्त केले.

संबंधित बातम्या

Back to top button