शाळेत राष्ट्रगीतानंतर आता ‘गर्जा महाराष्ट्र माझा’
राज्यगीत गाणे बंधनकारक, अन्यथा कारवाई होणार

* शिक्षण मंत्री दादा भुसे यांचा इशारा
मुंबई /6 ऑगस्ट : मराठी शाळेसोबतचं आता सर्व माध्यमाच्या शाळेत राष्ट्रगीतानंतर राज्यगीत गाणे बंधनकारक करण्यात आलं आहे. ’गर्जा महाराष्ट्र माझा’ हे राज्यगीत आता सर्वच शाळांमध्ये गाणे बंधनकारक असेल. जी शाळा याची अंमलबजावणी करणार नाही त्यावर कारवाई करण्यात येईल असा इशारा राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसेयांनी दिला आहे. मराठी शाळेत राष्ट्रगीत आणि राज्यगीत मानवंदनेने गायलं गेलं पाहिजे. मराठी शाळेसोबतचं आता सर्व माध्यमाच्या शाळेतही राष्ट्रगीतानंतर गर्जा महाराष्ट्र माझा हे राज्यगीत गाणं बंधनकारक आहे असा आदेश देण्यात आला आहे. पूर्वी इयत्ता चौथी आणि सातव्या वर्गाची शिष्यवृत्ती परीक्षा होत होती. त्यानंतर पाचव्या आणि आठव्या वर्गाची शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली.




